UPSC Success Story : वडिलांचे अचानक निधन; आईने दिले बळ; ऑनलाईन अभ्यास करुन मुलीने UPSC परिक्षेत केलं टॉप

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिहार (UPSC Success Story) येथील बक्सरच्या गरिमा लोहिया हिने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या यशात गरिमाची आई सुनीता लोहिया यांचा मोठा वाटा आहे. पतीच्या निधनानंतर सुनीता लोहिया यांनी आपल्या मुलीचे स्वप्न भंग होऊ दिले नाही. त्यांनी वेळोवेळी मुलीचे मनोबल वाढवण्याचे काम केले. गरिमाने मिळवलेल्या यशामध्ये केवळ तिच्या कुटुंबात आणि तिला ओळखणाऱ्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण बक्सरमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या त्यांच्या घरी अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे.

UPSC Success Story of Garima Lohiya

YouTube आणि इतर ऑनलाईन माध्यमांद्वारे मिळवले यश
गरिमाची आई सुनीता लोहिया आणि तिच्या भावाने सांगितले की, “तिचे शिक्षण बक्सरमधील वुड स्टॉक स्कूलमधून झाले आहे. नंतर सनबीम भगवानपूरमधून तिने 12 वी केली. त्यानंतर (UPSC Success Story) तिने करोरीमल कॉलेज दिल्लीतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या कोविड संक्रमण काळात ती बक्सरला परतली. मग बक्सरमध्येच राहून आयएएसची तयारी सुरू केली. YouTube आणि इतर ऑनलाईन माध्यमातून अभ्यास करून गरिमाने हे यश मिळवले. पण देशभरात एवढी चांगली रँक मिळेल असे कधी वाटले नव्हते.”

 

UPSC Success Story of Garima Lohiya

अभ्यासासाठी गाठली दिल्ली; पण कोरोनामुळे परतावे लागले (UPSC Success Story)
बक्सरच्या मातीत वाढलेली गरिमा अभ्यासासाठी दिल्लीला गेली. गरिमा आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीला गेली, पण कोरोनाच्या काळात तिला बक्सरला परतावे लागले. त्यानंतर बक्सरमधून तिने ऑनलाईन माध्यम आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला. मेहनतीला शॉर्टकट नसतो, असे गरिमाचे मत आहे. ती सांगते की, कोणत्याही विद्यार्थ्याने समर्पण आणि प्रामाणिकपणे मेहनत केली तर यश नक्कीच मिळते.

UPSC Success Story of Garima Lohiya

वडिलांच्या निधनानंतर आईने मुलीचे स्वप्न केले साकार
गरिमाने सांगितले की, ” माझ्या वडिलांचे 2015 मध्ये निधन झाले. मुलीला आयएएस अधिकारी बनवायचे हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. वडिलांच्या मृत्यूनंतर हे स्वप्न भंगले असते पण आईने ते होऊ दिले नाही. माझी आई मी अभ्यास करत असताना रात्रभर जागून राहायची. माझ्या खाण्यापिण्यापासून (UPSC Success Story) प्रत्येक गरज आई पूर्ण करत असे. मुलीच्या शिक्षणात कोणतीही कसर राहू नये म्हणून आईने तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आणि मी वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.”

UPSC Success Story of Garima Lohiya

गरिमाला बिहारमध्येच करायची आहे सेवा (UPSC Success Story)
गरिमाने सांगितले की, “मला बिहारमध्येच सेवा करायची आहे कारण माझा पहिल्यापासून बिहारशी संबंध आहे. आता मी आयएएस झाल्यानंतर मला बिहार केडरमध्येच रुजू व्हायचे आहे. आपल्या राज्यात येऊन गरजूंची सेवा करणे याला मी प्राधान्य देते;” असे ती म्हणते.

UPSC Success Story of Garima Lohiya

गरिमाच्या यशाने परिसरातील रहिवासीही आनंदी
गरिमाच्या यशाने परिसरातील रहिवासीही खूप उत्साहित (UPSC Success Story) आहेत. स्थानिक रहिवासी रामजी सिंह यांनी सांगितले की, गरिमाने अनेक रात्री जागून अभ्यास केला आहे. तिच्या या यशाने बक्सरवासीयांची छाती अभिमानाने रुंद झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com