करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सेनेत अग्नीवीर योजनेअंतर्गत (Agniveer Results 2023) घेण्यात आलेल्या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. यासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी इंडियन आर्मीची अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन निकाल तपासायचा आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा,दादर, नगर हवेलीच्या केंद्र शासित प्रदेशातील सुमारे 25 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.
भारतीय सेनेने जारी केलेल्या नोटीफीकेशननुसार, यंदा अग्नीवीर भरतीसाठी आवेदन प्रक्रिया 16 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झाली होती; तर अर्ज भरण्यासाठी 20 मार्च 023 पर्यंत अवधी देण्यात आला होता. आता आर्मी प्रशासनाने झोननुसार निकाल जाहीर केले आहेत.
Indian Army Agniveer Result 2023 कट ऑफ मार्क्स
1. अग्निवीर जी.डी- 50%
2. अग्निवीर जीडी (टेक)- 55%
3. अग्निवीर (ट्रेड्समैन)- 50% (Agniveer Results 2023)
4. अग्निवीर जीडी (ऑल आर्म्स)- 45%
5. अग्निवीर जीडी महिला- 40%
असा पहायचा निकाल – (Agniveer Results 2023)
1. निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in ला भेट द्या.
2. होमपेजवर झोननुसार पर्याय येतील.
3. आपल्या झोनवर जाऊन निकालावर क्लीक करा.
4. निकाल PDF मध्ये ओपन होईल.
5. रोल नंबर टाकून निकाल तपासा.
अग्नीवीर भरती निवड प्रक्रिया
आर्मी अग्नीवीर सीईई परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक फिटनेस आणि परीक्षणासाठी सहभागी होता येते. शेवटी मेडिकल चाचणीसाठी उपस्थित राहावे लागते. अग्नीवीरसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेच्या आधारावर भरती प्रक्रियेसाठी बोलावले जाते. अग्नीवीर भरतीसाठी (Agniveer Results 2023) आर्मी प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. अग्नीवीर भरतीच्या लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलावले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com