करिअरनामा ऑनलाईन । तारुण्यात पदार्पण करत (Business Success Story) असताना मुले – मुली करिअरचा गांभिर्याने विचार करू लागतात. साधारणपणे वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत मुले अभ्यास करत असतात. याला अपवाद आहे आदित पालिचा हा तरुण. त्याने अगदी लहान वयात 1200 कोटी रुपये कमावून विक्रम केला आहे. आदित पालिचा हा त्या कंपनीचा CEO आहे; ज्या कंपनीचे 2022 मध्ये मूल्यांकन 900 दशलक्ष डॉलर म्हणजेच 7300 कोटी इतके होते. विशेष बाब म्हणजे अवघ्या एका वर्षात या मुलाने आपल्या मित्रासोबत कोट्यवधींची कंपनी उभा केली. या माध्यमातून किराणा मालाची ऑनलाईन विक्री करणारं Zepto नावाचं प्लॅटफॉर्म 2021 मध्ये लाँच झालं.
स्टार्टअपसाठी शिक्षण अर्ध्यावर (Business Success Story)
2001 मध्ये मुंबईत जन्मलेल्या आदित पालिचा याने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यांनी GoPool नावाचा स्टार्टअप सुरू केला. संगणक अभियांत्रिकी पूर्ण करण्यासाठी तो यूएसमधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेला, परंतु स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याने अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि तो भारतात परतला.
1 महिन्यात कोटींची उलाढाल
आदितने त्याचा मित्र कैवल्य वोहरा याच्यासोबत एप्रिल 2021 मध्ये ऑनलाइन किराणा वितरण प्लॅटफॉर्म Zepto सुरू केला. स्टार्टअप सुरू केल्याच्या 1 महिन्याच्या आत कंपनीचे मूल्यांकन 200 दशलक्ष डॉलर झाले. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी 10 मिनिटांत किराणा सामान (Business Success Story) पोहोचवण्यासाठी हा स्टार्टअप सुरू केला आणि त्यांची संकल्पना खूप यशस्वी झाली. आदित पलिचाचा मित्र आणि कंपनीचे सहसंस्थापक कैवल्य वोहरा यांचीही कहाणी अशीच आहे. दोघेही स्टार्टअप सुरू करण्यासाठी स्टॅनफोर्डमधून बाहेर पडले. याआधी दोघांनी किरणकार्ट नावाचा स्टार्टअप सुरू केला होता, परंतु त्यांना त्यांचे उत्पादन बाजारात योग्य वाटले नाही म्हणून हा स्टार्टअप त्यांनी बंद केला.
फास्ट सर्व्हिस देण्याचं टार्गेट (Business Success Story)
2021 मध्ये दोन्ही मित्रांनी मिळून Zepto सुरू केले. यासाठी 2021 मध्ये त्यांनी 86 किराणा दुकानांशी सहकार्य केले आणि 10 लाख ऑर्डर वितरीत केल्या. कंपनीच्या लॉन्चच्या 5 महिन्यांत मूल्यांकन 570 दशलक्ष डॉलरवर पोहोचले. या यशासाठी आदित पालिचा आणि कैवल्य वोहरा यांचा 30 वर्षांखालील उद्योजकांच्या हुरुन यादीत समावेश करण्यात आला आहे. सध्या Zepto भारतातील 10 प्रमुख शहरांमध्ये (Business Success Story) कार्यरत आहे. कंपनीत 1 हजाराच्या आसपास कर्मचारी काम करतात. Zepto सुमारे 3 हजार उत्पादने वितरीत करते. यामध्ये फळे, भाजीपाला ते किराणा मालाचा समावेश आहे. Zeptoची खासियत म्हणजे तिची जलद वितरण सेवा आहे. ऑर्डर मिळाल्यापासून 10 ते 15 मिनिटांत वस्तु ग्राहकापर्यंत पोहच करणे हे कंपनीचे उद्दिष्टय आहे.
Zepto हायलाइट्स (Business Success Story)
- Startup Name – Zepto
- Legal Name – KiranaKart Technologies Private Limited
- Headquarters – Parel, Maharashtra, India
- Industry – Delivery, Delivery Service, and Grocery
- Founders – Aadit Palicha, and Kaivalya Vohra
- Founded – 2021
- Total Funding – $360 mn (May 2022)
- Valuation – $900 mn (May 2022)
- Areas Served – India
- Current CEO – Aadit Palicha
- Website – www.zeptonow.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com