Career Mantra : नोकरी देणारं शिक्षण!! परदेशात नोकरी मिळवण्यासाठी करा ‘हे’ कोर्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सध्या तरुण पिढीची चांगली नोकरी (Career Mantra) मिळवण्यासाठी सतत धावाधाव सुरु असते. जागतिक मंदीच्या काळात नोकरी मिळवणं आणि ती टिकवणं म्हणजे तारेवरची कसरतच. आजकाल अनेक तरुण नोकरीविना बेरोजगार झाले आहेत. अशा वेळी तुम्ही तुमच्या करीअरबाबत काहीतरी वेगळा विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सर्टिफिकेट कोर्सेस बद्दल सांगणार आहे, ते करूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. यापैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कोणताही कोर्स निवडू शकता.
विशेष म्हणजे हे सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर फक्त (Career Mantra) विद्यार्थीच नाही, तर व्यावसायिकांनाही या अभ्यासक्रमांच्या आधारे अधिक चांगली प्रगती करता येते. कारण हे कोर्स केल्यानंतर चांगली नोकरी मिळण्याची आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता दाट होते. पाहूया काही सर्टिफिकेट कोर्सविषयी…

1. गूगल सर्टिफाइड प्रोफेशनल क्लाउड आर्किटेक्ट (Career Mantra)
तुम्हाला आयटी उद्योगात चांगली संधी निर्माण करायची असेल, तर गुगल सर्टिफाइड प्रोफेशनल क्लाउड आर्किटेक्ट सर्टिफिकेट कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. हा अभ्यासक्रम या विशाल क्षेत्रातील भारतातील सर्वोत्तम प्रमाणपत्र कार्यक्रमांपैकी एक आहे. दुसरीकडे, क्लाउड जॉब इंजिनिअर्सची प्रचंड मागणी आणि कमतरता यामुळे, तुम्हाला झटपट नोकरी मिळू शकते. या नोकरीतून तुम्हाला लाखोंचे पॅकेज मिळू शकते.
2. कंप्लीट इनवेस्टमेंट बैंकिंग कोर्स
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी कंप्लीट इनवेस्टमेंट बैंकिंग कोर्स करणं फायद्याचं ठरू शकतं. या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक (Career Mantra) बँकिंगमध्ये चांगले करिअर करू शकता.

3. आर्टिफिशियल इंटेलीजेंस
या सर्टिफिकेशन कोर्सद्वारे तुम्ही ऑटोमेशन, रोबोटिक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि प्रोग्राम्स बद्दल तपशील मिळवू शकता. हे केल्यानंतर आरोग्यसेवा, शिक्षण, बँकिंग, वाहतूक क्षेत्रात नोकरी मिळवण सहज सोपं होतं.
4. साइबर सिक्योरिटी
पदवीनंतर तुम्ही सायबर सिक्युरिटी कोर्स करू शकता. हे तंत्रज्ञान नेटवर्क आणि गोपनीय डेटाचे चोरीपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. हे अभ्यासक्रम (Career Mantra) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्वायत्त वैज्ञानिक संस्थेद्वारे चालवले जातात.

5. वेब डेव्हलपर
वेब डेव्हलपरचे काम वेबसाइट (Career Mantra) डिझाइन करणे आहे. आजकाल, कोणताही व्यवसाय, लहान किंवा मोठा, स्वतःच्या वेबसाइटशिवाय प्रगती करू शकत नाही. त्यामुळे वेब डेव्हलपर प्रोफाइल तुमच्या करिअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com