करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी हजारो विद्यार्थी नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु काही मोजकेच तरुण ही परीक्षा पास करतात. UPSC परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांची अभ्यासाची स्वतःची वेगळी रणनीती असते आणि असे फार कमी विद्यार्थी असतात ज्यांनी आखलेली रणनिती परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात प्रभावी ठरते. असं म्हटलं जातं की आयुष्य तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे कोणालाही ठाऊक नाही आणि ही बाबा IAS दीपक रावत यांच्याशी अगदी जुळते.
IAS दीपक रावत यांच्याबद्दल (UPSC Success Story)
24 सप्टेंबर 1977 रोजी जन्मलेले दीपक रावत मूळचे बारलोगंज, मसुरी, उत्तराखंडचे आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण सेंट जॉर्ज कॉलेज, मसुरी येथे पूर्ण केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि एमफिलमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.
वडिलांनी पॉकेटमनी देणं केलं बंद
दीपक रावत जेव्हा 24 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना स्वतः पैसे कमवायला सांगितले आणि त्यांना पॉकेटमनी देणं बंद केलं. JNU मधून एमफिल केलेल्या (UPSC Success Story) रावत यांची 2005 मध्ये JRF साठी निवड झाली जिथे त्यांना दरमहा 8000 रुपये मिळू लागले त्यामुळे त्यांना खर्च भागवण्यास मदत झाली.
UPSC चे पहिले दोन प्रयत्न अयशस्वी
दीपक यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. बिहारमधील काही विद्यार्थी UPSC ची तयारी करत होते ते रावत यांना भेटले. या मित्रांमुळे दीपक यांना या क्षेत्रात रस निर्माण झाला आणि त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. दुर्दैवाने पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही. पण त्यांनी हार मानली नाही आणि कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाने त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात (UPSC Success Story) यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी त्यांची IRS अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांचं समाधान होत नव्हतं. त्यांनी पुन्हा परीक्षेची तयारी केली आणि त्यांना नेहमीच हवे असलेले IAS पद त्यांनी मिळवले. दीपक रावत यांनी 2007 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी संपूर्ण भारतातून 12 वी रॅंक मिळवली आहे. उत्तराखंड कॅडरचा IAS अधिकारी बनल्यानंतर त्यांनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले.
बनायचं होतं भंगार विक्रेता (Ragman)
दीपक जेव्हा 11वी-12वीच्या वर्गात शिकत होते तेव्हा बहुतेक विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा संरक्षण क्षेत्रात जाण्याची तयारी करत होते. पण दीपक यांना प्लॅस्टिक कॅन, टूथपेस्टच्या रिकाम्या नळ्या इत्यादी गोष्टींमध्ये रस होता. जर तुम्ही IAS अधिकारी बनला नसता तर तुम्ही करिअर (UPSC Success Story) म्हणून काय निवडले असते? या प्रशावर ते म्हणतात; “मी UPSC अधिकारी झालो नसतो तर मी ‘कबाडीवाला’ म्हणजेच भंगार विक्रेता (Ragman) होणं पसंत केलं असतं.” दीपक रावत यांना वाटले की कबाडीवाला बनल्याने त्यांना विविध गोष्टी शोधण्याची संधी मिळाली असती.
IAS दीपक रावत यांच्या पोस्टिंग
दीपक रावत यांनी बागेश्वरचे जिल्हा दंडाधिकारी, कुमाऊ मंडल विकास निगम, उत्तराखंडचे 2011 ते 2012 या कालावधीत व्यवस्थापकीय (UPSC Success Story) संचालक, 2014 ते 2017 पर्यंत नैनितालचे जिल्हा दंडाधिकारी, 2017 पासून हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी आणि 2017 पासून त्यांच्यावर कुंभकधीचा कार्यभार सोपवला होता. 2021 मध्ये MD-PTCU, MD-UPCL, आणि संचालक-उत्तराखंड रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (UREDA) म्हणून आणि सध्या कुमाऊँचे आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत.
सोशल मिडियावर असंख्य चाहते (UPSC Success Story)
दीपक रावत यांचे फेसबुकवर प्रचंड चाहते आहेत. त्याचे YouTube वर 4 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत आणि 14,000 हून अधिक लोक त्यांना ट्विटरवर फॉलो करतात.
किती मिळतो पगार
IAS सारखं प्रतिष्ठित पद आणि त्यासोबत मिळणारी ताकद पाहून आपल्यापैकी अनेकांना अजूनही प्रश्न पडतो की एक IAS अधिकारी किती पगार किती घेतात?” 7 व्या वेतन आयोगानुसार, IAS अधिकाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 56,100 रुपये आहे. आयएएस अधिकार्यांचा पगार (UPSC Success Story) अनेक वर्षांच्या सेवेवर अवलंबून असतो आणि तो 1,50,000 पर्यंत वाढू शकतो. त्यामुळे आम्ही दीपक रावत यांचा पगार त्यांच्या वर्षांच्या सेवा आणि पदोन्नतीनुसार 1,50,000 ते 1,80,000 रुपये इतका असेल असा अंदाज लावला आहे.
विजया सिंगशी प्रेमविवाह
दीपक रावत यांनी विजया सिंगशी लग्न केले आहे ज्या न्यायिक सेवांमध्ये अधिकारी आहेत आणि दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत. हंसराज कॉलेजमध्ये शिकत असताना दीपक विजया यांना भेटले आणि दोघेही प्रेमात पडले. दोघांनाही एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
IAS दीपक रावत या युवा पिढीसाठी प्रेरणा (UPSC Success Story) आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील सर्व अडथळ्यांवर मात करून UPSC परीक्षेच्या तयारीसाठी पूर्ण समर्पण दिले आहे. दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. आयएएस अधिकारी झाल्यावर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. जीवनात कधीही हार मानू नका; स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा; तुम्ही तुम्हाला जे हवं ते मिळवाल; असा बोध दीपक रावत यांच्या जीवन प्रवासातून घेता येईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com