करिअरनामा ऑनलाईन । उद्योगपती दीपाली गोयंका आणि (Dipali Goenka) सेबीचे माजी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांची अदानी समूहाच्या मालकीच्या NDTV ने स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. दोघांचा कार्यकाळ 27 मार्च 2023 पासून दोन वर्षांसाठी असेल. नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटीच्या शिफारसीच्या आधारे आणि शेअरधारक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
फोर्ब्सच्या भारतातील सर्वात शक्तिशाली महिला (Dipali Goenka)
दीपाली गोयंका या वेलस्पन इंडिया लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार दीपाली गोयंका या आशिया आणि भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहेत. नुकताच मुंबईतील वरळी येथे देशातील सर्वात (Dipali Goenka) महागडा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. तो सुप्रसिद्ध उद्योगपती बी. के. गोयंका यांनी त्यांची पत्नी दीपाली गोयंका यांच्यासाठी विकत घेतला होता. या घराची किंमत रतन टाटा यांच्या घरापेक्षा जास्त आहे.
मानसशास्त्राच्या पदवीधर
दीपाली गोएंका या मानसशास्त्रात पदवीधर आहेत. त्या हार्वर्डच्या माजी विद्यार्थिनी आहेत. दीपाली गोयंका यांनी वयाच्या 18 व्या वर्षी बी. के. गोयंकाशी विवाह केला. त्यांचे पती वेलस्पन ग्रुपचे चेअरमन आहेत. दीपाली गोयंका यांच्या लिंक्डइन अकाऊंटनुसार, त्या त्यांच्यातील उत्कृष्ट नेतृत्व कौशल्यामुळे (Dipali Goenka) ओळखल्या जातात. वेलस्पन ही जगातील सर्वात मोठ्या होम टेक्सटाईल कंपन्यांपैकी एक आहे. 2003 मध्ये दीपाली गोयंका यांनी स्पेसेस हा प्रीमियम बेड आणि बाथ ब्रँड लाँच केला होता.
दीपाली गोयंकांची Networth
दीपाली गोयंका ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सतत सक्रिय असतात. त्या एखाद्या सोशल मीडिया स्टारपेक्षा कमी नाहीत. इंस्टाग्रामवर त्याचे 191k फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे, जर वेलस्पन ग्रुपबद्दल सांगायचे झाले तर त्यांच्याकडे 25,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. कंपनीचे उत्पन्न 2.3 अब्ज डॉलर्स आहे. बी. के. गोएंका यांनी मुंबईत खरेदी केलेले पहिले पेंट हाऊस सुमारे 240 कोटी रुपयांचे आहे. या घरात (Dipali Goenka) ते पत्नी दीपाली गोएंकासोबत राहणार आहेत.
थ्री सिक्स्टी वेस्ट इमारतीच्या 63 व्या, 64व्या आणि 65व्या मजल्यावर बांधलेले हे पेंटहाऊस आता गोएंका दाम्पत्याचे नवीन घर आहे. त्याचे एकूण (Dipali Goenka) क्षेत्रफळ 30,000 चौरस फूट आहे. दुसरीकडे, जर आपण रतन टाटा यांच्या घराबद्दल बोललो तर त्याची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे.
मला एक व्यक्ती म्हणून विकसित व्हायचं होतं
दिपाली सांगतात; “मला पारंपारिक मारवाडी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभली आहे. तिथे मुलीचे लग्न कमी वयात होणं ही बाब अगदी सामान्य आहे. मला दोन मुली आहेत. त्यापैकी (Dipali Goenka) मोठी मुलगी 10 आणि लहान मुलगी 7 वर्षांची झाल्यानंतर मी व्यवसायात सक्रियपणे काम करू लागले. मला एक व्यक्ती म्हणून विकसित व्हायचे होते आणि त्याबद्दल माझ्या कल्पना स्पष्ट होत्या.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com