UPSC Success Story : नोकरी करतच केली तयारी; सेल्फ स्टडीच्या जोरावर UPSC क्रॅक; कशी होती IAS सर्जना यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. परंतु यामध्ये केवळ 1% उमेदवारांनाच यश मिळते. यामधील अनेक विद्यार्थी कोचिंगवर लाखो रुपये खर्च करतात. मात्र यानंतरही त्यांना यश मिळेलच असं नाही. या परीक्षेचा अभ्यास करताना नक्की कोणती स्ट्रॅटेजी वापरावी हे माहित नसणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

 

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

UPSC परीक्षा उत्तीर्ण कशी करायची याविषयी जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्या IAS अधिकाऱ्याकडून त्याच्या तयारीच्या पद्धती जाणून घेणे. इथे आम्ही तुम्हाला (UPSC Success Story) एका IAS अधिकाऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत; जी ने कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय सेल्फ स्टडीवर भर देवून ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

दिल्ली येथील IAS अधिकारी सर्जना यादव यांनी कोणतेही प्रशिक्षण न घेता UPSC परीक्षेची तयारी केली आणि 2019 मध्ये तिसर्‍याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षेत 126 वा क्रमांक मिळवून ती IAS अधिकारी बनली.

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

कोचिंग क्लासशिवाय केली तयारी (UPSC Success Story)

UPSC परीक्षेच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी महागड्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतात. यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. तर दुसरीकडे या परीक्षेबाबत सर्जना यादव यांचे मत पूर्ण वेगळे आहे.

एका मुलाखतीत सर्जना म्हणाली की, उमेदवाराच्या इच्छेवर त्याने कोचिंगची मदत घ्यावी की नाही हे अवलंबून आहे. जर तुमच्याकडे संपूर्ण अभ्यास साहित्य असेल आणि तुमची रणनीती चांगली असेल तर तुम्ही स्व अभ्यासावर अवलंबून राहूनही परिक्षेत यश मिळवू शकता.

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की तो क्लासमधील वातावरणात अधिक चांगली कामगिरी करू शकेल, तर त्याने कोचिंग क्लासमध्ये सामील व्हावे. जर तुम्ही शिस्तबद्ध आणि तुमच्या अभ्यासाप्रती प्रामाणिक असाल, तर सेल्फ स्टडी करणं कधीही उत्तम .

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

नोकरी करताना केली परीक्षेची तयारी केली

सर्जना यादवने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पदवीनंतर ती ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून नोकरी करू लागली. पूर्णवेळ नोकरीसोबतच, सर्जनाने UPSC परीक्षेची तयारी केली, पण पहिल्या दोन प्रयत्नांत तिला यश आले नाही. तिने हार मानली (UPSC Success Story) नाही आणि तर चुकांमधून ती बरेच काही शिकली .

परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी सर्जनाने 2018 मध्ये नोकरी सोडली होती. नोकरीसह केलेल्या प्रयत्नांमध्ये तिला पूर्ण लक्ष देता आले नाही, असे तिचे म्हणणे आहे. पण 2018 मध्ये तिने नोकरीचा राजीनामा दिल्यावर तिने अभ्यासाची पूर्णवेळ तयारी सुरू केली. तिने कोचिंग क्लासचा आधार न घेता सेल्फ स्टडीवर भर दिला. सर्जनाने सेल्फ स्टडीच्या माध्यमातून 2019 मध्ये संपूर्ण भारतात 126 वा क्रमांक मिळवून IAS अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण केले.

UPSC Success Story IAS Sarjana Yadav

कमी साहित्यात करा तयारी

सर्जना म्हणते की, “यूपीएससीचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे आणि प्रत्येक विषयाची 2-3 पुस्तके वाचल्याने तुम्हाला अभ्यासक्रम निर्धारित वेळेत पूर्ण करणे (UPSC Success Story) कठीण जाईल. यासाठी प्रत्येक विषयासाठी एक चांगले पुस्तक निवडून ते नीट लक्षपूर्वक वाचा. पुस्तकात एक किंवा दोन विषय समाविष्ट नसले तरीही, तुम्ही तो विषय गुगल वर सर्च करू शकता किंवा दुसऱ्या पुस्तकाचा संदर्भ घेण्याऐवजी सहज उपलब्ध संसाधने शोधू शकता.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com