MPSC NEWS : MPSC विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!! MPSCचे नवीन नियम 2025 पासून लागू होणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी (MPSC NEWS) करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. MPSC च्या परीक्षांसंदर्भातील नवे नियम 2025 पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

UPSC प्रमाणे आता MPSC परिक्षेत देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. हा पॅटर्न 2023 नव्हे तर 2025 पासून लागू करावा यासाठी हे विद्यार्थी (MPSC NEWS) आंदोलन करत आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. दरम्यान यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (MPSC NEWS) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतर मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून (MPSC NEWS) या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.
MPSCला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com