Maharashtra Jobs : अंगणवाडी सेविकांना लागली लॉटरी!! मानधनात दुपटीने वाढ अन् नवीन 20 हजार पदे भरणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच 20 हजार अंगणवाडी सेविकांची (Maharashtra Jobs) भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती. यापाठोपाठ अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना लवकरच नवे मोबाइल देण्यासाठी 125 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही सांगण्यात आले.

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार (Maharashtra Jobs) पडली. या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर 20 हजार अंगणवाडी सेविकांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना इतरही सुविधा देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी भाडेतत्त्वावर अंगणवाडी भरविल्या जातात. अशा अंगणवाड्यांना अत्यंत तुटपुंजे भाडे देण्यात येते. काही ठिकाणी ३ ते ४ हजार रुपयेच भाडे मिळते. त्यामुळे या अंगणवाड्यांचे भाडे वाढवून देण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय (Maharashtra Jobs) राज्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत नवा प्रस्तावांच्या हालचालींना वेग आला असून त्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत आणि इतर भागातील शाळांमधील सुमारे २० हजार खोल्या अंगणवाड्यांसाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यंतरी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’वर बैठक झाली. या बैठकीत अंगणवाडी (Maharashtra Jobs) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com