Career Mantra : चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळवायची? फॉलो करा ‘या’ 5 टिप्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धेच्या युगात चांगल्या पदाची आणि मोठ्या (Career Mantra) पगाराची नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. जितका चांगला अनुभव असेल तितकी चांगली नोकरी मिळते. मंदीच्या काळात अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड पडत आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे अनुभव नसेल त्यांना नोकऱ्या कशा मिळणार? हा प्रश्न उपस्थित होतो. असे असले तरीही नोकरीच्या शोधात असणाऱ्या फ्रेशर्सनी काही काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला 5 महत्वाच्या टिप्स सांगत आहोत, ज्या तुम्ही फॉलो केल्या तरी तुम्हाला नोकरी मिळणे सोप्पे होईल.

सर्वोत्तम फॉरमॅटमध्ये CV तयार करा

First impression is last impression असं म्हटलं जातं. ही म्हण CVच्या बाबतीत लागू होते. तुमचा CV म्हणजेच Resume ही पहिली गोष्ट आहे जी मुलाखत घेणारा सर्वप्रथम (Career Mantra) पाहतो. तुमचा सीव्ही जर सर्वोत्तम फॉरमॅटमध्ये लिहिला असेल आणि तुमच्या सर्व पात्रता त्यात नमूद केल्या असतील तर त्याचा मुलाखतीवेळी नक्कीच चांगला परिणाम होईल.

नेटवर्किंग वाढवा (Career Mantra)

तुम्ही तुमच्या कॉलेजच्या दिवसांपासून नेटवर्किंग वाढवायला सुरुवात करा. कॉलेजच्या वयात असल्यापासूनच तुम्ही अधिकाधिक प्रोफेशनल्स व्यक्तींना भेटा आणि तुमची ओळख वाढवा. यामध्ये तुम्ही तुमच्या वरिष्ठांची आणि प्राध्यापकांचीही मदत घेऊ शकता. याशिवाय, सोशल मीडिया साइट्सवर आपले कौशल्य शेअर करा. ट्विटर, लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तज्ञ आणि प्रोफेशन्सल्सशी संपर्क साधणे या गोष्टी खूप फायदेशीर ठरतात.

स्वतःमधील सॉफ्ट स्किल्स ओळखा

व्यावसायिक कौशल्यांव्यतिरिक्त आपल्याकडे असे अनेक गुण असतात जे नोकरीवेळी उपयोगी येतात. आपल्याकडे असलेली नेतृत्व कौशल्ये, संवाद कौशल्ये, व्यवस्थापन (Career Mantra) कौशल्ये ओळखता आली पाहिजेत. ज्या लोकांना अनुभव नाही, तेदेखील ही कौशल्ये दाखवून आणि वापरून चांगली नोकरी मिळवू शकतात.

इंटर्नशिप सुरु करा 

जेव्हा कॉलेजचे शिक्षण घेत असाल तेव्हापासूनच (Career Mantra) इंटर्नशिप करायला सुरुवात करा. यामुळे तुम्हाला शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होईल. इंटर्नशिप करुन अनुभव मिळविलेल्या फ्रेशर्सची मागणी अनेक कंपन्यांना असते.

तुमच्यातील कौशल्य वाढवा

कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच तुम्ही स्वत:कडील कौशल्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. पदवीसह इतर अनेक ऑनलाइन कोर्स, प्रमाणपत्र कार्यक्रम किंवा (Career Mantra) प्रशिक्षण करू शकता. यामुळे तुम्हाला इतर लोकांकडून काही जादा  ज्ञान मिळेल. ही गोष्ट पुढे नोकरीच्या निवडीत खूप फायदेशीर ठरेल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com