Motivational Story : वाचा नापास मुलांची गोष्ट!! ‘हे’ विद्यार्थी शाळेत नापास झाले पण मोठेपणी बनले IAS अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन। यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण (Motivational Story) परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार देशाचे उच्च पदस्थ अधिकारी होतात. देशातील लाखो तरुण-तरुणी दरवर्षी जीव तोडून UPSC परीक्षेची तयारी करत असतात. या परीक्षेचा प्रवास अत्यंत खडतर आहे. पण भारतात असेही काही किमयागार आहेत  जे शाळेत शिकत असताना नापास झाले होते; पण आज ते UPSC ची परीक्षा पास होवून क्लास वन अधिकरी बनले आहेत. पाहूया कोण आहेत हे किमयागार..

1. रुक्मणी रियार (IAS)

आयएएस रुक्मणी रियार राजस्थानमध्ये कलेक्टर आहेत. त्या मूळच्या पंजाबमधील चंदीगडच्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या सहावीला असताना (Motivational Story) नापास झाल्या होत्या. पण असे असतानाही त्यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रॅंक 2 मिळवून इतके मोठे स्थान मिळवले आहे. रुक्मणी रियार यांचे वडील देखील आयएएस अधिकारी आहेत.

Motivational Story

2 . मनोज शर्मा (IPS) (Motivational Story)

महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज शर्मा हे बारावीमध्ये नापास झाले होते. इयत्ता बारावीत नापास होण्याबरोबरच इतर वर्गात देखील त्यांना खूप कमी गुण मिळाले होते. पण यानंतर त्यांनी न डगमगता कठोर मेहनत करून UPSC परीक्षेत ठसा उमटवला आहे. त्यांची कथा आपल्या सर्वांना खरोखर प्रेरणा देते.

Motivational Story

3. अंजू शर्मा (IAS)

IAS अंजू शर्मा यांनी स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्या दहावीच्या प्री बोर्डात नापास झाल्या होत्या. इतकंच नव्हे तर बारावी दरम्यान त्यांना पुन्हा (Motivational Story) अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, नंतर त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आयएएस अंजू शर्मा यांनी या नंतर कसून मेहनत घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. या काळात त्यांच्या आईने त्यांना मोलाची साथ दिली.

Motivational Story

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com