Police Bharti : लवकरच पोलिस भरतीची जाहिरात निघणार; फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल बोलतांना फडणवीसांना (Police Bharti) येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 10 लाख रोजगार देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आज राज्यातील विविध भागांमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागातील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात येत आहे. पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा महाराष्ट्रात होत असून राज्य सरकार 75 हजार (Police Bharti) तरुणांना नोकऱ्या देत आहे. पोलिस विभागासह मुख्यमंत्री इतरही सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवणार आहेत. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं फडणवीस म्हणाले.

रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्यांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्र देणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आरोग्य विभागात लवकरच 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी काल केली आहे. येत्या 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान जाहिरात निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com