Success Story : नैसर्गिक शेतीतून वर्षाला मिळतोय तब्बल 9 ते 10 लाखांचा नफा; ‘या’ शेतकऱ्याने दिलेला कानमंत्र जाणून घ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। गेल्या दोन दशकात शेतकरी आपल्या कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी (Success Story) रासायनिक खते, रसायने, कीटकनाशके टाकून हायब्रीड भाजीपाला विकत आहे अन् लोकांनाही पर्याय नसल्याने ते असा भाजीपाला खात आहेत. अशा परिस्थितीत नैसर्गिक शेती करून कमी खर्चात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखवणाऱ्या हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील दयाक बुखार गावचे प्रगतशील शेतकरी शैलेंद्र शर्मा आता हजारो शेतकऱ्यांसाठी एक उदाहरण बनले आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शैलेंद्रच्या शेतात पिकलेल्या शिमला मिरचीची खात्री पटली होती.

अवघड वळणांचा प्रवास

शैलेंद्र यांचा प्रवास काही सोपा नव्हता. गेल्या दोन दशकांपासून ते पारंपरिक शेती करत आलेत. रासायनिक खते व रसायनांमुळे त्यांच्या शेतातील जमिनीची सुपीकता पूर्णपणे ढासळली होती. त्याशिवाय माती कडक झाली होती. शैलेंद्र जेव्हा रासायनिक खतांची फवारणी करत असे, तेव्हा त्यांच्या त्वचेवर चट्टे येऊ लागले, त्यामुळे त्यांना (Success Story) ॲलर्जी झाली. शैलेंद्र यांच्या म्हणण्याप्रमाणे रासायनिक खतांचा जर त्यांच्यावर इतका परिणाम होत असेल तर पिकांवर आणि लोकांवर त्याचा किती परिणाम होत असेल; हा प्रश्न त्यांना पडला.

चार वर्षांपासून करत आहेत नैसर्गिक शेती (Success Story)

एकदा शैलेंद्र शर्मा कृषीतज्ञ् सुभाष पालेकरांनी आयोजित केलेले चर्चासत्र ऐकायला गेले आणि इथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. शैलेंद्र गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक शेतीशी जोडले गेले आणि हळूहळू त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम दिसू लागले. त्यामुळे शैलेंद्र यांना आता दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. गेल्या चार वर्षात नैसर्गिक शेतीचा अवलंब करून विषमुक्त शेती करत असल्याचे ते सांगतात.

उत्पन्नात लक्षणीय वाढ

नैसर्गिक शेतीमुळे ते घेत असलेल्या शेती उत्पन्नातही लक्षणीय वाढ होत आहे. पूर्वी जिथे रासायनिक खतांच्या वापरासाठी त्यांना 1 लाख ते 1.25 लाख रुपये खर्च येत होता. आता त्या खर्चात कपात झाली आहे. नैसर्गिक (Success Story) शेती सुरु केल्यापासून त्यांना खतांसाठी केवळ 15 ते 16 हजार रुपये खर्च येतो. नैसर्गिक शेती करू लागल्यापासून ते वर्षाला 9 ते 10 लाख रुपये कमावत आहेत.

गूळ, बेसन आणि कडुलिंबाच्या पानांचा वापर

नैसर्गिक शेती करण्यासाठी फक्त गूळ, बेसन आणि कडुलिंबाची पाने खर्च होत असल्याचे शैलेंद्र यांनी सांगितले. ज्यासाठी त्यांनी एक संसाधन भांडार तयार केले आहे ज्यामध्ये ते जीवामृत आणि घंजीवामृत तयार करतात. ही घन आणि द्रव दोन्ही खते आहेत जी शैलेंद्र कमी खर्चात तयार करतात. यासाठी शैलेंद्र यांनी देसी जुगाडही तयार केला आहे.

अशी होते फवारणी

देशी गोमूत्र आणि शेण बनवल्यावर ते एका ड्रममध्ये साठवले जाते. त्यानंतर गोमूत्र, शेण, गूळ, बेसन आणि कडुलिंबाची पाने यांचे मिश्रण करून माती तयार करून फवारणी (Success Story) केली जाते. हे जीवामृत आणि घंजीवमृत लाल आणि पिवळ्या शिमला मिरचीसाठी ऊर्जा बूस्टर म्हणून काम करते.

Success story of farmer shailendra sharma

अनेक शेतकऱ्यांनी केलं अनुकरण

शैलेंद्र यांनी सांगितले की, “अनेक शेतकरी हिमाचलमध्ये नैसर्गिक शेतीचा अवलंब करत आहेत. हिमाचलच्या विविध ठिकाणांहून शेती कशी करावी याची माहिती घेत आहेत. निसर्गाशी एकरूप होऊन शेतकरी काम करू लागला आहे. मी केलेलं कार्य इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे त्यामुळे त्यांच्या देखील उत्पन्नात वाढ होत आहे याचा मला आनंद आहे.”

9388 हेक्टर जमिनीवर होतेय नैसर्गिक शेती (Success Story)

हिमाचलचे कृषी सचिव राकेश कंवर म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांबरोबरच सोलन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही कल नैसर्गिक शेतीकडे वाढत आहे. राज्यातील 3615 पैकी 3590 पंचायतींमध्ये ही शेती पद्धत पोहोचली असून आतापर्यंत 1,71,063 शेतकरी याच्याशी जोडले गेले आहेत, त्यामुळे राज्यातील 9388 हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती केली जात आहे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com