करिअरनामा ऑनलाईन | नाशिकच्या अक्षय वाखारेने युपीएससी परिक्षेत ऑल इंडिया रँक 203 (AIR 203) पटकावत (UPSC Success Story) त्याच्या आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण केलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2021 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि पुण्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेला अक्षय सुनिल वाखारे IAS अधिकारी झाल्याची बातमी हाती आली. या परीक्षेत अक्षयने ऑल इंडिया रँक 203 पटकवला आहे. अक्षयचा हा तिसरा प्रयत्न होता. तिसऱ्या प्रयत्नात अक्षयने यशाचं शिखर गाठलं आहे. पाहूया, कसा होता अक्षयचा IAS होण्याचा प्रवास…
मूळचा नाशिकचा रहिवासी अक्षय
अक्षय हा मुळचा नाशिकचा रहिवासी आहे. त्याचे वडिल नाशिकमधील करंन्सी नोट प्रेसमध्ये नोकरीला आहेत आणि आई गृहीणी आहे. 2016 मध्य़े तो इंजिनिअरींगचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला. सिंहगड अभियांत्रिकी (UPSC Success Story) महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण पुर्ण केलं. 2017-18 मध्ये इंजिनियरिंगच्या अभ्यासामुळे त्याला UPSC परीक्षांच्या अभ्यासाला वेळ मिळाला नाही. मात्र 2018 नंतर त्याने अधिकारी होण्याचा निश्चय करून जोमात अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीच्या दोन प्रयत्नात त्याला परीक्षेत यश मिळाले नाही मात्र तिसऱ्या प्रयत्नात अक्षयने ऑल इंडिया रँक 203 मिळवत स्वत:ला सिद्ध केलं.
युनिक अकॅडमीचा विद्यार्थी
पुण्यातील युनिक अकॅडमी ही युपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारी करून घेणारी मोठी अकॅडमी आहे. याच अकॅडमीतून अक्षयने अभ्यासाला सुरुवात केली. आतापर्यंत या अकॅडमीने अनेक अधिकारी घडवले आहेत. अजूनही अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याचं स्वप्न बघत या अकॅडमीत प्रवेश घेतात.
अशी होती अक्षयच्या अभ्यासाची पद्धत (UPSC Success Story)
UPSC ची परीक्षा देताना तुझी दिनचर्या कशी होती; असे विचारल्यास अक्षय म्हणतो, “माझा स्पेशल विषय मानववंशशास्त्र (ANTHROPOLOGY) होता. माझी ठरवलेली दिनचर्या नव्हती. मात्र किती अभ्यास रोज करायचा याचं मी नीट नियोजन केलं होतं. दिवसभरात केव्हाही तो ठरवलेला अभ्यास पुर्ण करायचा हेच ध्येय असायचं. प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही किंवा कोणत्या ट्रिक्स वापरुन आपण योग्य उत्तर निवडू शकतो, याकडे माझं लक्ष असायचं. वेळ वाया जाणार नाही, याकडेदेखील लक्ष असायचं. ऑप्शनल विषय आणि निबंध लेखनाचा मी फार सराव केला. लॉजिकल प्रश्नांवर जास्त भर दिला. कारण ते प्रश्न थोडे गोंधळात टाकणारे असतात. याच प्रश्नांचा मी फार सराव केला. अभ्यासाबरोबर योग्य आहार, पुरेशी झोप या गोष्टींची सांगड घातली. त्यामुळेच कदाचित हे यश मिळालं आहे. मी ज्या पद्धतीने अभ्यास करत होतो त्यावरून मी माझ्या प्रयत्नात यशस्वी होईन हे मला पक्क माहित होतं.”
आई – वडिलांचं स्वप्न सत्यात उतरलं
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत अक्षयने केलेली कामगिरी उत्तुंग आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे कुटुंबीय आनंदून गेले आहे. अक्षयचे वडील सांगतात, “निकाल लागल्यापासून (UPSC Success Story) आम्हा सगळ्यांना अभिनंदनाचे फोन कॉल येत होते. आई-वडिलांसाठी मुलांनी त्यांचं स्वप्न पुर्ण केल्याचा आनंद फार वेगळा असतो. तो आनंद आम्ही जगतोय आणि अनुभवतोय सुद्धा. अक्षयने कठोर परिश्रमाने हे यश मिळवलं आहे. भविष्यात अक्षयच्या हातून समाजासाठी विधायक कामं व्हावीत.”
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com