UPSC Success Story : 1 वर्षाची तयारी अन् बनली IAS; अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली UPSC; कशी होती अनन्याची स्ट्रॅटेजी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यासाठी (UPSC Success Story) विद्यार्थी अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करतात. मात्र, काही उमेदवार असे आहेत की, ज्यांना योग्य स्ट्रॅटेजी आणि कठोर मेहनतीमुळे पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. अशीच एक कहाणी अनन्या सिंगची. अनन्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे. तिने अवघ्या एका वर्षाच्या तयारीने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि पहिल्याच प्रयत्नात ती IAS अधिकारी बनली. पाहूया जिद्दी अनन्याचा IAS होण्याचा प्रवास कसा होता…

बोर्डाच्या परीक्षेत जिल्ह्यात टॉपर

अनन्या सिंग पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार होती. तिने प्राथमिक शिक्षण प्रयागराज येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून केले. अनन्याला 10वीत 96%, तर 12वीत 98.25% गुण मिळाले होते. अनन्या दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गात CISCE बोर्डातून संपूर्ण जिल्ह्यातून टॉपर होती. 12वी नंतर अनन्याने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी घेतली.

दररोज 7 ते 8 तास अभ्यास केला – (UPSC Success Story)

अनन्या सिंगला लहानपणापासूनच IAS अधिकारी व्हायचे होते आणि त्यामुळे पदवीच्या शेवटच्या वर्षात तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला अनन्या रोज 7 ते 8 तास अभ्यास करायची, पण पाया मजबूत झाल्यावर तिने अभ्यासासाठी 6 तास वेळ द्यायचे ठरवले. परीक्षा पास होण्यासाठी संपूर्ण एक वर्ष अनन्याने खूप मेहनत घेतली.

अनन्या च्या काही टिप्स

अनन्या सिंगने टाइम टेबल बनवून परीक्षेची तयारी केली. तीने सुरुवातीला पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रित तयारी केली. अनन्या म्हणते की, पूर्व आणि मुख्य परीक्षेपूर्वीचा काळ खूप कठीण असतो (UPSC Success Story) आणि या काळात तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे. अनन्याने सांगितले की, तयारी सुरू करण्यासाठी तिने आधी पुस्तकांची यादी तयार केली आणि अभ्यासक्रमानुसार पुस्तके जमा केली. यासोबत गरजेनुसार हाताने नोट्स बनवली. नोट्सचे दोन फायदे होते, एक म्हणजे ते लहान आणि सुटसुटीत होते, ज्यामुळे ते तयार करण्यात आणि रिव्हिजनसाठी खूप उपयुक्त होते. यासोबतच नोट्स लिहिल्यामुळे उत्तरेही मनात नोंदवली गेली.

पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश

अनन्या सिंगने अवघ्या एक वर्षासाठी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळाले. तिने 2019 मध्ये अखिल भारतात 51 वा क्रमांक मिळवला आणि IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सध्या अनन्याची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये आयएएस अधिकारी म्हणून आहे.

असे आहे अनन्याचे उच्चशिक्षित कुटुंब

अनन्या सिंगचे वडील माजी जिल्हा न्यायाधीश आहेत आणि तिची आई अंजली सिंग IERT मध्ये वरिष्ठ लेक्चरर आहेत. त्यांचा मोठा भाऊ ऐश्वर्या प्रताप सिंग कानपूरमध्ये मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून तैनात आहे. याशिवाय अनन्याची वहिनी ज्योत्स्नाही कानपूरमध्ये न्यायदंडाधिकारी आहे.

अनन्याचा मेन्स परीक्षेनंतरही सराव सुरूच होता

यूपीएससी मेन्स दिल्यानंतरही अनन्याच उत्तरलेखनाचा सराव सुरूच होता. कारण तिला वाटत होते; की कमी वेळ असल्याने तिने यावेळी जास्त उत्तरे लिहली नाहीत. मात्र, मेन्सचा निकाल (UPSC Success Story) हाती आल्यानंतर काही वेगळंच घडलं होतं. निळकं लागल्यानंतर अनन्याला लेखनाचा सराव थांबवावा लागला होता. कारण तिने देशातील सर्वात कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली होती.

UPSC देणाऱ्यांना अनन्याचा सल्ला

अनन्या सिंग UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मागील वर्षाच्या पेपरमध्ये जाण्याचा आणि पुनरावृत्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देते. ती म्हणते की; “तुम्ही जितके मागील वर्षाचे पेपर पाहू शकता तितके पाहिले पाहिजेत, कारण कधीकधी काही विषयांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होते. तुम्ही जे काही वाचले आहे त्याची उजळणी करणेही खूप महत्त्वाचे आहे. परीक्षेची तयारी करताना न्यूज पेपर वाचणे कधीही थांबवू नका आणि मुलाखतीपूर्वीही ते वाचत राहा, कारण परीक्षेत आणि मुलाखत दोन्हीमध्ये न्यूज पेपर वाचनाचा खूप फायदा होतो.”

तसेच ती सांगते; “UPSC देणाऱ्या प्रत्येकाने प्रिलिम्सच्या अभ्यासासोबत मेन्स परीक्षेचा अभ्यास करणे हि गरजेचे आहे. कारण प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्स परीक्षेच्या तयारीसाठी थोडे (UPSC Success Story) दिवस उमेदवारांच्या हातात असतात. त्यामुळे तुम्ही फक्त प्रिलिम्सची तयारी करत राहिला तर मेन्सच्या परीक्षेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com