राज्यातील महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं जाहीर केला होता.

उदय सामंत काय म्हणाले?

  • १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कॉलेजे बंद राहतील.
  • सर्व अकृषी विद्यापीठांसोबत खासगी विद्यापीठ, महाविद्यालयांनाही हा निर्णय लागू राहील.
  • या कालावधीत शिक्षण ऑनलाइन होईल.
  • काही कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरुंनी त्यांची सोय करावी.
  • गोंडवाना, नांदेड, जळगाव विद्यापीठांत नेट जोडणीची अडचण असल्याने स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात.
  • कॉलेज, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू कराव्यात.
  • सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील.
  • मात्र परदेशी विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन वसतिगृहात राहू शकणार आहेत.
  • विद्यापीठे तसेच कॉलेज विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसतील तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी.
  • पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचेही लसीकरण करावे.
  • दहावीच्या चित्रकला परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार.
  • या परीक्षा उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येतात.
  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये ५० टक्के उपस्थिती असेल.
  • ही उपस्थिती चक्राकार पद्धतीने राबवणे अनिवार्य असेल