करिअरनामा । महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे राज्यसरकारने 31 मार्चपर्यंत सर्व शाळा, मंदिरे, लायब्ररी बंद ठेवण्याचा तसेच या काळात होणाऱ्या दहावी , बारावीच्या परीक्षा सोडून इतर परीक्षा रद्द केल्या आहेत. MPSC Exam Date
आयोगाने 31 मार्चपर्यंत कोणतीही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यसेवेची पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. MPSC Exam Date
राज्यसेवेची पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 ला होणार आहे. यावेळी योग्य ती काळजी घेतली जाईल. तसेच परीक्षा व्यवस्थित नियोजित वेळापत्रकारांनुसार होईल. अस पत्रक राज्यसेवा आयोगामार्फत काढण्यात आले आहे. राज्यातील 31 मार्च पर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षांच्या पुढील तारखांचा विचार केला जाईल. असेही आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. MPSC Exam Date
नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”