Breaking News : 10 वी ची परीक्षा रद्द तर 12 वी च्या परीक्षा होणार; शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांची माहिती

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला. अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात चर्चा झाली. यावर्षीच्या १० वीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यावर एकमताने निर्णय झाला आहे. यावर्षी १०वीच्या शाळा या ऑनलाईन पद्दतीने घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण या संदर्भात काही असेसमेंट घ्यायच्या असतील तर त्यासंदर्भातला निर्णय लवकर घेण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेद्वारे १०वी, १२वीच्या परीक्षांच्या संदर्भात महत्वाची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी १०वी आणि १२वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आणि लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. पण सध्या राज्यातला कोरोनाचा प्रसार लक्षात घेता १०विच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.