केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली.    (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020)

सीमा सुरक्षा दलात २८९२६, केंद्रीय राखीव पोलीस दलात २६५०६, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात २३९०६, सशस्त्र सीमा दलात १८६४३, इंडो-तिबेट पोलीस दलात ५७८४, आसाम रायफल्समध्ये ७३२८ जागा रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  या काही दिवसात राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू यामुळे ही संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दलांमध्ये नव्याने पदनिर्मिती करण्यात आली आहे. रिक्त असणाऱ्या पदांपैकी अधिकतम पदे ही कॉन्स्टेबल स्वरूपाची आहेत.  ही पदे भरण्यासाठी सामान्यतः थेट भरती, प्रतिनियुक्ती, बढती अशा पद्धती वापरल्या जातात. त्यामुळे लवकरच सेवा भरती नियमाला अनुसरून पुढील पदे भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

1 Lakh Posts vacancies in CRPF 2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com