करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 34 जिल्हा (ZP Recruitment 2023) परिषदांमध्ये 19 हजार 460 पदांची नोकर भरती होणार आहे. त्यासाठी तब्बल 41 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज केला असून एका जागेसाठी सरासरी 75 उमेदवार स्पर्धेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय विभागांमधील 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू असून आता जिल्हा परिषदांमधील रिक्तपदांसाठी अर्ज मागविले आहेत. दि. 5 ते 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. आता अर्जाची छानणी होऊन परीक्षा पार पडतील. उमेदवारांची संख्या पाहता एक-दोन दिवसात परीक्षा पार पाडणे अशक्य असल्याने किमान आठ दिवसांत वेगवेगळ्या टप्प्यांवर जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमदेवारांची परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्यात सुशिक्षितबेरोजगरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याची वस्तुस्थिती तलाठी भरतीनंतर आता जिल्हा परिषदांच्या भरतीत देखील समोर आली आहे. एका ठिकाणी अपयश आल्यानंतर तोच उमेदवार पुन्हा दुसऱ्या पदासाठी अर्ज करतोय, असे चित्र आहे. त्यामुळे एका उमेदवाराला आठ ते दहा हजार रुपये अर्ज फीपोटी भरावे लागणार आहेत.
पदवी, पदव्युत्तर पदवी व अभियांत्रिकी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज (ZP Recruitment 2023)
खासगी क्षेत्रातील नोकरीपेक्षा शासकीय नोकरीत सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे त्याठिकाणी पगाराची व नोकरीची शाश्वती असल्याने जिल्हा परिषदांमधील गट-क व गट-ड संवर्गातील पदांसाठी बारावी उत्तीर्णची अट असतानाही पदवी, पदव्युत्तर पदवी व अभियांत्रिकीचे शिक्षण (ZP Recruitment 2023) घेतलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. तलाठी, पोलिस भरती, अंगणवाडी मदतनीस भरतीवेळी देखील अशी वस्तुस्थिती समोर आली होती. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदांमधील पदभरतीसाठी अवघ्या 20 दिवसांत तब्बल साडेचौदा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
जिल्हा परिषद भरतीचा तपशील –
एकूण रिक्त पदे : १९,४६०
प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज : १४.५१ लाख
अर्जातून जमा झालेले शुल्क : १४५ कोटी
एका जागेसाठी अर्ज : ७५
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com