YCMOU MBA Admission 2023 : मुक्‍त विद्यापीठाची MBA प्रवेश प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज; पहा वेळापत्रक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यशवंतराव चव्‍हाण (YCMOU MBA Admission 2023) महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे MBA अभ्यासक्रम २०२३-२४ च्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून पात्रता मिळवत प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. प्रवेश परीक्षेच्‍या नोंदणीची मुदत २९ ऑगस्‍टपर्यंत असून, ३० ऑगस्‍टपूर्वी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या सवडीनुसार ऑनलाईन प्रवेश परीक्षा देता येईल. अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

राज्‍यस्‍तरावर विस्‍तार असलेल्‍या या विद्यापीठातून MBAचे शिक्षण घेण्याची संधी राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना उपलब्‍ध आहे. MBAला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा बंधनकारक आहे. ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जाणाऱ्या या प्रवेशप्रक्रियेत यशस्‍वी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्‍या पोर्टलवर ऑनलाइन प्रवेश परीक्षा अर्ज व शुल्‍क भरावयाचे असून, नोंदणीकृत विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल. त्‍यानंतर मुख्य प्रवेश परीक्षा देता येईल.

प्रवेश प्रक्रियेचं स्वरुप असं असेल (YCMOU MBA Admission 2023)
1. प्रवेश परीक्षेत पात्र झालेल्‍या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावरून प्रवेश पर्यायाद्वारे प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करावी.
2. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना शिक्षणक्रम आणि अभ्यास केंद्र तसेच विषयांची निवड करून शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे.
प्रवेश अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर मुख्यालयातील नोंदणी कक्षाशी संपर्क साधून आपली पात्रता तपासून घ्यावी. त्‍यानंतरच प्रथम वर्षाचा प्रवेश निश्‍चित झाला, असे समजण्यात येईल. प्रवेश परीक्षेत पात्र नसलेल्‍या विद्यार्थ्यांना पुन्‍हा नोंदणी करून परीक्षेला सामोरे जाता येईल, असेही विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

काही महत्वाच्या तारखा –
 1. प्रवेश परीक्षेच्‍या नोंदणीची मुदत : 29 ऑगस्ट 2023
2. ऑनलाइन परीक्षा देण्याची मुदत : 30 ऑगस्‍ट 2023
3. प्रवेश निश्‍चितीची मुदत : 31 ऑगस्‍ट 2023
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com