शाळेच्या बस पिवळ्या रंगाच्या का असतात ? घ्या जाणून

करिअरनामा । शाळेची बस पिवळ्या रंगाची का असते हे तुम्हाला माहितेय ? विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व शालेय वाहनांना पिवळा रंग दिलेला असतो मग ती व्हॅन असो किंवा बस. पिवळ्या रंग देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पिवळा रंग हा लांबूनही दिसतो. लाल रंगापेक्षा १.२४ पट जास्त स्पष्ट दिसतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सर्वच शाळांच्या बसला पिवळा रंग देणे बंधनकारक आहे. हा नियम फक्त भारतातच नसून जगातील अनेक देशांमध्ये लागू आहे. पिवळा रंग अंधारातही लांबून नजरेस पडतो त्यामुळे अपघात तसेच धुक्यातही हा रंग दिसून येतो.

अंधारात रस्त्यावरील लाल रंगाच्या सिग्नलमध्ये पिवळा रंग दिसून येतो. शहरातील स्ट्रीटलाईट या पिवळ्या रंगाच्या असल्यामुळे शाळेच्या बसचा पिवळा रंग अधिक गडद दिसतो त्यामुळे दुर्घटना टाळता येते. शाळेतील मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पिवळ्या रंगाचे महत्व अधोरेखित होते. त्यामुळे हा नियम सर्वच शाळांच्या बसला लागू आहे.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”