आज शिवजयंतीसोबत आणखी काय विशेष ?

करिअरनामा ।आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवसालाच एक वेगळं महत्त्व आहे. आपला जन्म जसा महत्वाचा आहे तसेच आपण रोज काय करतो, आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यातही काही घडलंय का हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते. अनेकदा आपल्या जन्मापूर्वीचं आपल्याला माहित नसतं. अशावेळी दिनविशेष नावाचा प्रकार या सगळ्या गोष्टींची आठवण आपल्याला करून देतो. शालेय परिपाठात दिनविशेष सांगितले जायचे, फळ्यावर लिहले जायचे. आता आम्हीसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत जगभरातले दिनविशेष..जगात त्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या १० घटनांची माहिती तुम्हाला आम्ही ‘आज काय विशेष?’ या आमच्या सदरात देणार आहोत. हे सदर आपल्याला नक्की आवडेल अशी आशा..!!

१ ) १६३० – पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म .

२) १९४६ – मुंबई बंदरात ‘तलवार’ या बोटीवरील हिंदी सैनिकांनी गोऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात बंद पुकारले.

३) २००२ – कामगार नेते शिवसेनेची मुलुख मैदान तोफ दत्ताजी साळवी यांचे निधन .

४) १९०५ – इतिहासाचे अभ्यासक ,संपादक ,सामाजिक कार्यकर्ते डॉ.हरिहर वामन देशपांडे यांचा जन्म .

५) १९९४ – विचारवंत ,कायदेविषयक ग्रंथकर्ते आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा .त्र्यंबक कृष्णराव टोपे यांचे निधन .

६) १९९७- ‘माणूस ‘साप्ताहिकाचे संपादक आणि ‘श्रीगमा ‘नावाने प्रसिद्ध असणारे श्रीकांत गणेश माजगावकरांचे निधन.

७) १९७४- मुंबई जवळील समुद्रात bombe हाय येथे तेलसाठा सापडला .

८) १९२२- ख्यातनाम फ्रेंच गणिती कॅमिली जॉर्जन यांचे निधन

९) २०१५ – सोमालियात एका पंचतारांकित हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २० ठार

१०) १९७९- ‘नाट्यमन्वंतर ‘या संस्थेचे संस्थापक केशव नारायण काळे यांचे निधन .

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”