WFH Jobs : Work from Home विषयी हर्ष गोएंका काय म्हणतात…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियावरील आपल्या प्रेरणादायी (WFH Jobs) पोस्टसाठी ओळखले जातात. हर्ष गोएंका यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये ऑफिसमधून काम करण्याचे फायदे सांगितले आहेत. कोरोनामुळे सर्व ऑफिसला वर्क फ्रॉम होम सारखी पावलं उचलावी लागली. साथीचा रोग असल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास भाग पाडले गेले. आता ऑफिस पुन्हा सुरू होत आहेत. आयुष्य पूर्ववत होत चाललंय. असं असून सुद्धा बऱ्याच अशा कंपनी आहेत ज्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच करायला सांगत आहेत. अनेक कारणं आहेत ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अशा सूचना दिल्या जात आहेत. पण हर्ष गोएंका यांनी मात्र एकच कारण दिलंय ज्यात वर्क फ्रॉम होम का नसावं आणि वर्क फ्रॉम ऑफिस का असावं याबद्दल सांगितलं आहे.

या संदर्भात हर्ष गोयंका यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये हर्ष गोयंका यांनी टू-पाई चार्टचा वापर केला आहे. एखादा कर्मचारी ऑफिसमध्ये आणि घरी दोन्ही ठिकाणी काम (WFH Jobs) आणि इतर गोष्टींवर किती वेळ घालवतो? हे दाखविण्यात आलं आहे.

पहिल्या पाई चार्टमध्ये घरात असताना कर्मचारी काम काम आणि फक्त कामच करतोय असं दाखविण्यात आलंय. तर दुसऱ्या पाई चार्टमध्ये कर्मचारी कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींमध्ये वेळ घालवताना दिसतो.

कर्मचारी ऑफिसमध्ये असला की ब्रेक घेणे, इतरांना (WFH Jobs) त्यांच्या कामात मदत करणे आणि ऑफिसमध्ये कॉफी पिणे, ट्राफिकमध्ये बसणे असं सगळं करत असतो.

हर्ष गोयंका यांनी ही पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘हे एक कारण आहे की, तुम्ही ऑफिसमधून काम करावे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com