[Gk Update] बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

करिअरनामा । राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता बॉलिवूड अभिनेता ऋषि कपूर यांचे आज निधन झाले.  चार दशकांहून अधिक काळ त्यांनी अभिनय कारकीर्द गाजवली. 1970 साली बाल कलाकार म्हणून ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाद्वारे त्याने पदार्पण केले होते. त्यात या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता.

ऋषि कपूर यांची पहिली मुख्य भूमिका 1973 मध्ये बॉबी या चित्रपटाद्वारे समोर आली. त्यांच्या ह्या अभिनयासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना  देण्यात आला होता. 2008 मध्ये ऋषी कपूर यांना फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

ऋषि कपूर यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक शानदार चित्रपट केलेत.  विशेष म्हणजे ऋषीकपूर यांचे वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूरही या अभिनय कलेच्या जगात सक्रिय राहिले होते.  सध्या त्यांचा मुलगा रणबीर कपूर  बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.

ऋषि कपूर यांचे चित्रपट
अमर अकबर अँथनी, रफू चक्कर, सरगम, कर्ज,  लैला मजनू, बोल राधा बोल, बॉबी, चांदानी डी-डे , लव आज कल, कपूर अँड सन्स आणि इतर अनेक चित्रपट त्यांचे हिट ठरले आहेत.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-