करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात उर्दू शिक्षकांची भरती (Urdu Shikshak Bharti 2023) प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने सूचित केले आहे. सध्या राज्यात उर्दू प्राथमिक शिक्षकांची 3 हजार 12 पदे रिक्त असून ही उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली आहे.
राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली 22 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले (Urdu Shikshak Bharti 2023) आहेत. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
यासाठी राज्यात प्रस्तावित 30 हजार शिक्षक भरतीत अल्पसंख्याक (Urdu Shikshak Bharti 2023) समाजातील डीएड- बीएड धारक बेरोजगारांना न्याय मिळवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक शाळेत रिक्त पदे रिक्त असल्याने दोन-तीन वर्गाचे अध्यापन कार्यरत शिक्षक यांना करावे लागत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com