UPSC Update : UPSC परीक्षेसाठी उमेदवारांचे आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन होणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षे संदर्भात केंद्र सरकारने (UPSC Update) महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात झालेल्या वादानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने UPSCला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे. आता युपीएससी उमेदवारांचे पहिल्यांदाच आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफेकशन केले जाणार आहे.

आयोगाला आधार अधिनियम २०१६ मधील सर्व तरतुदी त्याच्या अंतर्गत बनवण्यात आलेले नियम आणि विनियम आणि भारतीय विशिष्ट्य ओळख प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे (UPSC Update) पालन करावे लागेल, असेही या अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले आहे; त्यामुळे पुढील काळात UPSCकडून उमेदवारांचे वेगवेगळ्या टप्यावर आधार व्हेरिफिकेशन केले जाणार आहे.

केंद्र सरकारकडून आधार आधारित ओळख पटवण्याची (UPSC Update) परवानी मिळाल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. यामध्ये केलेल्या उल्लेखानुसार यूपीएससीला वन टाइम रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करत असताना आणि परीक्षा, भरती परीक्षेच्या विविध टप्प्यांमध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी ऐच्छिक आधारावर ऑथेंटिकेशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी E-KYC ऑथेंटिकेशन सुविधेचाही उपयोग केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com