करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या 685 उमेदवारांपैकी (UPSC Success Story) एक भोपाळची रहिवासी सोनाली परमार. यूपीएससी परीक्षेसाठी तिचा हा पहिलाच प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नात तिने ही परीक्षा क्रॅक करून इतिहास रचला. सोनाली परमार ही सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. शाळा-कॉलेजमध्ये तिची गणना नेहमीच टॉपर विद्यार्थ्यांमध्ये होत असे. आज आम्ही तुम्हाला IPS सोनाली परमारची यशोगाथा सांगणार आहोत…
असं आहे सोनालीचं कुटुंब
इच्छावर जिल्ह्यातील सिहोर तालुक्यातील पालखेडी या छोट्याशा गावातील सोनाली रहिवासी आहे. तिचे वडील डॉ. राजेंद्र परमार हे कृषी विभागात अधिकारी आहेत तर आई अर्चना परमार कृषी विभागात सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागात वाढलेल्या सोनालीने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यास केला आहे.
प्रीती मैथिल यांच्याकडून मिळाली प्रेरणा (UPSC Success Story)
सोनाली परमारने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, कौटुंबिक पार्श्वभूमी शेतीची असल्याने तिचा कलही शेतीकडे होता. तीने जबलपूर विद्यापीठातून B.Sc अॅग्रीकल्चरमध्ये पदवी घेतली आहे. तिला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याची प्रेरणा जिल्ह्यातील पहिल्या IAS अधिकारी प्रीती मैथिल यांच्याकडून मिळाली. १२ वी सायन्स करून मेडिकलला ऍडमिशन न घेता सोनालीने UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
लहानपणीच पाहिलं होतं स्वप्न
सोनालीने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने लहानपणापासून घरात यशस्वी अधिकाऱ्यांच्या यशोगाथा ऐकल्या आहेत. या कथांमधून प्रेरणा घेत सोनालीने प्रशासकीय सेवेत जाऊन (UPSC Success Story) अधिकारी होण्याचं ध्येय लहानपणीच ठरवलं. अधिकारी होण्यासाठी शालेय वयापासूनच तिने तयारी सुरु ठेवली.
12 ते 14 तास केला अभ्यास
सोनाली परमारने अभ्यासात मन भरकटू दिले नाही. UPSC क्रॅक करण्यासाठी तीने रात्रंदिवस अभ्यास केला. यूपीएससी परीक्षा पास होण्याचे तिचे ध्येय स्पष्ट होते. यासाठी ती सतत 12 ते 14 तास अभ्यास करायची. अभ्यासादरम्यान तिने मोबाईल फोन पासूनही अंतर ठेवले होते. ती रोज स्वतःसाठी एक ध्येय ठरवायची आणि ते साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यायची. चालू घडामोडींमध्ये स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी ती रोज न चुकता वर्तमानपत्रे वाचत असे. अभ्यासाच्या योग्य नियोजनामुळे आणि प्रचंड मेहनतीने सोनालीने 2021 च्या UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून 187 वा क्रमांक मिळवला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com