UPSC Success Story : कोचिंग क्लास न लावता परीक्षेचे आव्हान पेलले; KBCचे विजेते असे बनले IPS अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयपीएस अधिकारी रवी मोहन सैनी यांचे (UPSC Success Story) जीवन खूपच संघर्षमय होते. 2001 मध्ये चार्ट-बस्टिंग टेलिव्हिजन शोमध्ये हजेरी लावून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खळबळ निर्माण केली तेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता. राष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवल्यानंतर ते आधी एमबीबीएस (MBBS) डॉक्टर बनले आणि नंतर नागरी सेवेत अधिकारी बनले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का IPS रविमोहन सैनी हे कोण आहेत?

सेल्फ स्टडीतून केली UPSC ची तयारी
रवी सैनी (IPS Ravi Saini) नेहमीच अभ्यासात हुशार होते. ते परिक्षेत नेहमीच अव्वल यायचे. त्यांनी जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (MBBS) पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची (UPSC) तयारी करण्याचा विचार केला. ही परीक्षा आव्हानात्मक समजली जाते. पण (UPSC Success Story) रवी यांनी या परीक्षेसाठी कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये रुजू होण्याचा विचार केला नाही. UPSC परीक्षेची संपूर्ण तयारी त्यांनी सेल्फ स्टडीतूनच केली आहे.

वडील नेव्हीत अधिकारी आणि मुलगा IPS (UPSC Success Story)
रवी यांचे वडील नौदलात अधिकारी होते. वडिलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय पोलीस सेवेत सामील होण्याचे ठरवले. 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSCची परीक्षा दिली. यावेळी ते पूर्व परीक्षा पास झाले मात्र मुख्य परीक्षेत ते यश मिळवू शकले नाही. 2013 मध्ये त्यांची भारतीय टपाल विभागाच्या लेखा आणि वित्त सेवांसाठी निवड झाली. असे असलेतरी त्यांनी 2014 मध्ये पुन्हा UPSC ची परीक्षा दिली. यावेळी त्यांना यश मिळाले. त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली आणि संपूर्ण भारतातून त्यांनी 461 वी रँक मिळवली आणि ते IPS अधिकारी बनले.

लहानपणी KBC मध्ये जिंकले 1 कोटी
रवि मोहन सैनी यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ (KBC Junior) मध्ये भाग घेतला होता. चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हा गेम शो जिंकला होता. यावेळी त्यांना 15 कठीण प्रश्न विचारण्यात आले होते. सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्यांनी 1 कोटी रुपये जिंकले. यावेळी प्रसार (UPSC Success Story) माध्यमांमध्ये त्यांचे नाव चांगलेच झळकले. त्यांना खूप प्रसिध्दी मिळाली. त्यानंतर सुमारे 20 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले जेव्हा 2021 मध्ये ते गुजरातमधील एका शहराचे एसपी (SP) बनले तेव्हा.

KBC च्या यशाने आत्मविश्वास वाढवला
रवी सैनी हे लहानपणापासूनच गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. जेव्हा ते 10वीत होते तेव्हा त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती ज्युनियर’ या शोमध्ये यश मिळवले. त्यांना या शोमध्ये जाऊन आपले नशीब आजमावायचे होतेच पण याचबरोबर त्यांना बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांना भेटायचे होते. सैनी यांनी कौन बनेगा करोडपती हा गेम अतिशय शानदारपणे जिंकला आणि शेवटी 1 कोटी रुपयेही जिंकले. हे यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे ते नेहमी सांगतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com