UPSC Success Story : त्याने रिस्क घेतली; 35 लाखाच्या नोकरीला केलं गुड बाय; UPSC देवून IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी अखंड (UPSC Success Story) समर्पण आणि प्रचंड मेहनत आवश्यक आहे. या परीक्षेला बसणाऱ्या लाखो उमेदवारांपैकी काही मोजकेच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS, IPS सारख्या देशातील A दर्जाचे अधिकारी पद मिळवू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका उमेदवाराबद्दल सांगणार आहोत ज्यांनी IPS पद मिळविण्यासाठी चक्क 35 लाख रुपये पगाराची नोकरी नाकारली होती. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी नाकारणे हे मोठे धाडसच म्हणावे लागेल. तरी पण या तरुणाने आयुष्यात खूप मोठी रिस्क घेवून आपले करिअर विषयी स्वप्न साकार केले आहे.

JEE परीक्षेत संपूर्ण शहरात अव्वल
आपण बोलत आहोत अर्चित चांडक (IPS Archit Chandak) या तरुणाविषयी. तो नागपूरचा रहिवासी आहे. अर्चित चांडकने 2012 साली JEE परीक्षेत संपूर्ण शहरातून अव्वल स्थान मिळवले आहे. JEE पास केल्यानंतर अर्चितने आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळवली आहे.

UPSC साठी 35 लाखांच्या नोकरीची ऑफर नाकारली
पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, इंटर्नशिप दरम्यान अर्चितला जपानी कंपनीने 35 लाख रुपयांचे वेतन पॅकेज ऑफर केले होते. पण अर्चितला सरकारी कर्मचारी बनून देशसेवा करायची होती, म्हणून त्याने ही नोकरीची ऑफर नाकारली.

देशात 184 वी रँक मिळवून बनला IPS (UPSC Success Story)
अर्चितने 2016 मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. 2018 मध्ये पहिल्यांदा तो UPSC परीक्षेस बसला आणि पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय 184 वा क्रमांक मिळवून आयपीएस पद मिळवले. अर्चित सुरुवातीला भुसावळच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडत होता. नंतर त्याची नागपूर येथे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बॅचमधील IAS तरुणीशी केले लग्न
अर्चित चांडक आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. त्यांना (UPSC Success Story) व्यायामाप्रमाणे बुद्धिबळही खेळायला आवडते. त्यांचे FIDE रेटिंग 1,820 आहे. तसेच त्यांनी 42 कि. मी. ची मुंबई मॅरेथॉनही पूर्ण केली आहे. अर्चित चांडक यांनी त्यांची UPSC बॅचमेट IAS सौम्या शर्मा यांच्याशी लग्न केले आहे. IAS सौम्या शर्मा जिल्हा परिषद नागपूरच्या CEO म्हणून काम पाहत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com