UPSC Success Story : 33 सरकारी परीक्षा नापास झालेला तरुण जिद्दीने बनला IPS; चकित करणारी आहे कहाणी….

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार (UPSC Success Story) येत असतात, पण जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या विचारांवर कटिबद्ध राहिला तर टप्प्याटप्प्याने का होईना पण यश मिळतेच. आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा वाचणार आहोत ज्या व्यक्तीने आयुष्यात हार न मानता IPS अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे. 12 वी पास झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीत रुजू होण्याचे ध्येय ठेवले होते. त्यांचे मुख्य लक्ष यूपीएससी (UPSC) परीक्षा पास करण्यावर होते. त्यांनी ठरल्याप्रमाणे सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी आणि फॉर्म भरण्यास सुरुवात केली. सुरवातीला त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी दोन-चार नाही तर तब्बल 30 वेगवेगळ्या सरकारी परीक्षा दिल्या पण प्रत्येक वेळी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे आदित्य कुमार…

तब्बल 33 वेळा झाले नापास (UPSC Success Story)
आदित्य राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील अजितपुरा या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. एवढ्यावेळा आलेल्या अपयशाने कोणीही निराश होवू शकतं. पण आदित्य त्यापैकी नव्हते. ते आपल्या संकल्पापासून मागे हटले नाहीत. वारंवार अपयशी येवूनही त्यांनी हार मानली नाही. या सर्व परीक्षेत नापास झाल्यावर पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आणखी एक मोठा संकल्प केला.

गाव सोडून दिल्लीत आले
2013 मध्ये ते गाव सोडून दिल्लीत आले आणि UPSC ची तयारी सुरू केली. सरकारी परीक्षांमध्ये सतत अपयश येत असल्याने लोक त्यांना टोमणे मारायचे. “जो सामान्य परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही तो यूपीएससीसारखी कठीण परीक्षा कशी उत्तीर्ण होऊ शकतो?” असं बोलून लोक हिणवायचे. कदाचित त्याच्या (UPSC Success Story) जिद्दीची कल्पना कुणालाच आली नसेल. सर्वसाधारण परीक्षांमध्ये 30 वेळा आणि UPSC परीक्षेत 3 वेळा नापास होऊनही, 2017 मध्ये UPSC च्या चौथ्या प्रयत्नात परीक्षा पास करून त्यांनी संपूर्ण कथाच बदलून टाकली.

आयपीएस आदित्य कुमार यांनी केवळ यूपीएससी परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर त्यांच्या रँकच्या आधारे त्यांना आयपीएस कॅडर देखील मिळाले. 2018 च्या UPSC निकालात त्यांना 630 वा क्रमांक मिळाला आहे. जे लोक कालपर्यंत त्यांच्या अपयशावर टोमणे मारत होते, ते आता त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करत आहेत. आदित्य आज पंजाबमध्ये आयपीएस अधिकारी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्यांनी स्वत: त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले. त्यांनी दिलेल्या विविध परीक्षांमध्ये अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) आणि बँकिंग सारख्या परीक्षांचा समावेश होता.

मुलाखतीत अती आत्मविश्वास नडला
2014 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसले तेव्हा त्यांना पूर्व परिक्षाही पास करता आली नाही. नंतर 2015 मध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाल्यावर स्वतःमधील अती (UPSC Success Story) आत्मविश्वासामुळे ते मुलाखत फेरीत नापास झाले. यानंतर 2016 च्या परीक्षेतही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र 2017 मध्ये आदित्य यांनी यश खेचून आणले. आदित्य कुमार सध्या पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात ASP म्हणून तैनात आहेत. आदित्य यांचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. काही साध्य करायचे असेल तर मेहनत हाच एकमेव मार्ग आहे, अशी शिकवण त्यांना त्यांच्या पालकांनी लहानपणापासूनच दिली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com