करिअरनामा ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या IFS आरुषी मिश्रा (UPSC Success Story) यांनी आयआयटी मधून बीटेकची पदवी मिळविली. त्यांचे पती चरचित गौर हे आयएएस अधिकारी आहेत. आरुषीने कठोर परिश्रम घेत यूपीएससीने घेतलेल्या भारतीय वन सेवा (Indian Forest Services) परिक्षेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
पहिल्यापासूनच आहे टॉपर
आरुषी यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९५.१४ टक्के आणि बारावीला बोर्डाच्या परीक्षेत ९१.२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर आयआयटी रुरकी येथून २०१४ च्या (UPSC Success Story) बॅचमधून बी.टेक केले. यानंतर आरुषीने सरकारी नोकरीसाठी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
असा केला अभ्यास
आयएफएस आरुषी मिश्रा यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासची मदत घेतली. त्यांनी विषयनिहाय टेस्ट सिरीज आणि अभ्यासाचे साहित्य गोळा केले होते. परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी त्यांनी अनेक मॉक टेस्ट दिल्या होत्या. यूपीएससी परीक्षेत अपयश (UPSC Success Story) मिळाल्यानंतर त्यांनी कोचिंग क्लासमध्ये शिकवायला सुरुवात केली. यासोबतच वृत्तपत्रांच्या जाहिरातीमधून त्या नोकरी शोधत असत.
प्रत्येक अपयशानंतर घेतली दुप्पट मेहनत (UPSC Success Story)
आयएफएस आरुषी मिश्रा यांनी यूपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS) परीक्षेत २०१८ मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. याआधी यूपीएससी परीक्षेत त्यांना २२९ रँकसह आयआरएस पद देण्यात आले होते. दरम्यान, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १६ वी रँक (UPSC Success Story) आणि डीएसपी पद मिळाले. आरुषी यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक अपयशानंतर त्यांनी दुप्पट मेहनत करून परीक्षेची तयारी केली.
वडील वकील तर आई व्याख्याता
भारतीय वन सेवेतील अधिकारी आरुषी मिश्रा यांचा जन्म ३१ जानेवारी १९९१ रोजी प्रयागराज येथे झाला. त्यांचे वडील अजय मिश्रा हे ज्येष्ठ वकील आहेत आणि आई नीता मिश्रा व्याख्यात्या आहेत. आरुषीचा धाकटा भाऊ अर्णव मिश्रा उत्तर प्रदेशात उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत (UPSC Success Story) आहे. IFS आरुषी मिश्रा यांचे पती IAS चरचित गौर हे आग्रा विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आहेत. IFS आरुषी मिश्रा या आग्रा वन विभागात डेप्युटी DFO आहेत.
दोघांनीही एकमेकांना दिली साथ
IFS आरुषी मिश्रा यांनी 2021 मध्ये IAS चरचित गौर यांच्याशी लग्न केले. IAS चरचित गौर हे 2016 च्या बॅचचे अधिकारी आहेत आणि IFS आरुषी मिश्रा 2019 च्या अधिकारी आहेत. या दोघांनी एकमेकांना खूप दिवसांपासून डेट केले होते UPSC परीक्षेच्या प्रवासात दोघांनीही एकमेकांना मित्र आणि मार्गदर्शकाप्रमाणे साथ दिली.
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय
आरुषी मिश्रा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास 30 हजार फॉलोअर्स आहेत. UPSC इच्छुकांना मदत करण्यासाठी त्या अनेकदा (UPSC Success Story) मार्गदर्शक सत्रात भाग घेत असतात. त्यांच्या फोटोंच्या कमेंटमध्येही, फॉलोअर्स त्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल आणि यशाच्या टिप्सबद्दल मत विचारतात.
आरुषी यांनी शेअर केल्या अभ्यासाच्या टिप्स
- आरुषीने यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स जाणून घेवूयात…
- परीक्षेची रणनीती समजून घेऊन अभ्यासाचा आराखडा तयार करा.
- वेबसाइटवर उपलब्ध शैक्षणिक YouTube व्हिडिओ आणि अभ्यास सामग्रीवरून नोट्स तयार करा.
- अभ्यासावर लक्ष केंद्रित (UPSC Success Story) करण्यासाठी दररोज 30 मिनिटे ध्यान आणि व्यायाम करा.
- जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा.
- कोचिंग आणि स्टडी मटेरियलच्या अधिक पर्यायांमुळे गोंधळ होवू देवू नका.
आरुषी सांगतात सुरुवातीला इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याचा आधार घेवून त्यांनी अभ्यास केला नाही. त्यामुळे परीक्षेतील कामगिरीवरही परिणाम झाला. या दरम्यानच्या काळात समाजाच्या दबावालाही सामोरे जावे लागले असले तरी आरुषी यांना घरच्यांचा खूप पाठिंबा मिळाला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com