करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या (UPSC Success Story) स्वतःच्या वेगळ्या कथा असतात. एखाद्या उमेदवाराची वेगवेगळ्या पदांसाठी 10 वेळा निवड होते तर एखाद्या उमेदवाराला त्याच्या पसंतीचे पद मिळत नाही. एका उमेदवाराने 10 वेळा UPSC ची परीक्षा दिली, 3 वेळा मुलाखत दिली, तरीही त्याची निवड झाली नाही; अशावेळी संयमाने काम घेणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची गोष्ट सांगणार आहोत, ज्याची UPSC मधून निवड झाली, पण याबद्दल त्याला स्वतःलाही आश्चर्य वाटत आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरसमधील रहिवासी
आम्ही बोलत आहोत वात्सल्य कुमारबद्दल. वात्सल्य हा UPSC 2014 बॅचचा अधिकारी आहे. UPSC परीक्षा पास केल्यानंतर, त्याला सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा (AFHQCS) मध्ये पोस्टिंग मिळाले. वात्सल्यचा जन्म उत्तर प्रदेशातील हाथरसमधील चमन पुरा या छोट्याशा (UPSC Success Story) गावात झाला. वात्सल्यने छबिलदास पब्लिक स्कूलमधून 10वी आणि 12वी आणि AKG अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक. पूर्ण केले. यानंतर त्याने UPSC ची तयारी केली आणि 2014 मध्ये त्याने UPSC परीक्षा पास केली. त्याला आर्म्ड फोर्सेस हेड क्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस पोस्ट मिळाली.
विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स
वात्सल्यचा विश्वास आहे की; जर तुम्ही नकारात्मक निकाल आल्यानंतर खचून न जाता पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही अयशस्वी का झाल ते जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे का घडले? यावर विचार मंथन व्हायला हवे. माझे ज्ञान (UPSC Success Story) कमी होते, सर्व प्रश्न नीट वाचले नाहीत. आणखी छोट्या चुका केल्या. घाईत काहीतरी चुकले. प्रश्नांची उत्तरे अधिक चुकीची झाल्याने निगेटिव्ह मार्किंगमध्ये गुण वजा करण्यात आले. या गोष्टींचा बारकाईने विचार व्हायला हवा. सर्वप्रथम, तुम्ही शक्य तितक्या मॉक इंटरव्ह्यू द्यायला हव्यात. इतक्या मॉक टेस्ट सोडवा की तुमच्या मनात एक ब्ल्यू प्रिंट तयार होईल आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना त्याचा फायदा होईल. लक्ष केंद्रित करा. लक्ष केंद्रित करून मागील वर्षांचे पेपर सोडवा. स्पर्धा परीक्षा देताना जुने पेपर सोडवणे नेहमी फायद्याचे ठरते; असा सल्ला वात्सल्यने दिला आहे.
वडील आहेत इन्स्पेक्टर
वात्सल्यचे वडील रवींद्र कुमार गौतम उत्तर प्रदेश पोलिसात इन्स्पेक्टर आहेत, तर आई मुन्नीदेवी या गृहिणी आहेत. वात्सल्यने यशाचे श्रेय राजस्थानमधील पाली येथील (UPSC Success Story) काका मुकेश कुमार गौतम आणि मोठा भाऊ के. पी. गौतम यांना दिले आहे. यासोबतच ते पीसीएस अधिकारी नितीन तिवारी आणि आयएएस मित्र विक्रम यांना त्यांच्या यशाचे भागीदार मानतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com