UPSC Success Story : लहानपणीच ठरवलं होतं हिंसाचार संपवायचा; वाचा नक्षली भागात राहून नम्रता जैन IAS कशी बनली?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। स्वतःचं करिअर घडवणं हे केवळ आणि केवळ त्या विद्यार्थ्याच्याच (UPSC Success Story) हातात असतं. UPSC सारख्या कठीण परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा कस लागतो. प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक असते. असे विद्यार्थी इतरांसमोर आदर्श ठेवतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी काही ना काही संघर्ष करूनच तिथपर्यंत पोहोचलेले असतात. छत्तीसगढमधील IAS ऑफिसर नम्रता जैन हिची कहाणी अशीच संघर्षानं भरलेली पण इतरांना प्रेरणा देणारी आहे.

UPSC Success Story of IAS Namrata Jain

नक्षलग्रस्त जिल्ह्यात झालं शिक्षण

छत्तीसगढच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यातून नम्रता जैन हिनं शिक्षण घेतलं. दंतेवाडातील कारली येथील निर्मल निकेतन स्कूलमधून तिनं शालेय शिक्षण पूर्ण केलं. दहावीची बोर्डाची परीक्षा दिल्यावर मात्र तिच्यासमोर पेच उभा ठाकला होता. कारण शिक्षणासाठी घरापासून लांब राहणं घरच्यांना मान्य नव्हतं. मात्र यात तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. घरच्यांची समजूत काढल्यानंतर केपीएस भिलाई स्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा दिल्यावर भिलाई इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून नम्रतानं B.Tech केलं.

अचानक कोसळलं संकट (UPSC Success Story)

उत्तम करिअर घडवायचं असेल, तर त्याची सुरुवात बाल वयातच करावी लागते. नम्रतानंही अधीकारी होण्याचं स्वप्न शालेय वयातच पाहिलं. आठवीत असताना शाळेच्या एका कार्यक्रमात भाषण देण्यासाठी कलेक्टर आले होते. तिच्या वडिलांनी आयएएस ऑफिसर म्हणजे कोण, त्यांचे अधिकार काय असतात, याविषयी तिला सांगितलं होतं. तेव्हाच तिच्या मनावर या पदाचा प्रभाव पडला. तिनं UPSC परीक्षेची तयारी सुरु केली खरी, पण त्याच दरम्यान 6 महिन्यांच्या अंतरानं तिच्या दोन काकांचा हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू झाला. या धक्क्यांमुळे ती मानसिकदृष्ट्या थोडी खचली, पण काकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुप्पट मेहनतीनं तिनं तयारी सुरू केली.

पोस्टिंगपासून लग्नापर्यंत…

नम्रतानं 2015मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र पहिला प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर 2016 मध्ये तिनं पुन्हा परीक्षा दिली. यात 99वी रॅंक मिळवून मध्य प्रदेश केडरमधून ती IPS ऑफिसर झाली. IAS होण्याच्या आपल्या ध्येयापासून तिनं माघार घेतली नाही. तिनं तयारी सुरुच ठेवली. पुन्हा 2018 मध्ये 12 वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेत (UPSC Success Story) दाखल होण्यासाठी ती IAS बनली. त्यानंतर दोन वर्षांनी 16 सप्टेंबर 2020 मध्ये तिनं आयपीएस ऑफिसर निखिल राखेचा याच्याशी लग्न केलं. छत्तीसगढमधील महासमुंद जिल्ह्यात तेव्हा त्याची नेमणूक झाली होती. 2019 मध्ये ट्रेनिंगदरम्यान त्यांची ओळख झाली व तिथेच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या लग्नासाठी जिल्ह्यातील अनेक ऑफिसर्स उपस्थित होते.

नक्षलींचा अड्डा, दंतेवाडा

छत्तीसगढमधील दंतेवाडा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. इथे साक्षरतेचा दर तर कमी आहेच, शिवाय बेरोजगारी, घरगुती वादाची प्रकरणं यांचं प्रमाणही अधिक आहे. ज्या भागात नम्रता जैन हिचं घर होतं, त्या भागात केवळ 2G इंटरनेट चालत होतं. इतक्या अडचणींमधूनही मार्ग काढण्याची ताकद जिद्द आणि मेहनतीमुळेच मिळते. आयएएस (UPSC Success Story) ऑफिसर नम्रता जैन हिच्या प्रवासामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.

UPSC Success Story of IAS Namrata Jain

IAS नम्रता विषयी थोडक्यात –

  1. नम्रता ही छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील आहे.
  2. तिचे वडील झंवरलाल जैन हे व्यापारी आहेत.
  3. तिची आई किरण जैन गृहिणी आहे.
  4. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे; तिचे आजोबा पन्नास वर्षांपूर्वी बस्तर येथे स्थलांतरित झाले. तेव्हापासून हे कुटुंब बस्तरमध्ये राहत आहे.
  5. नम्रता ही भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भिलाई येथून अभियांत्रिकी पदवीधर आहे.
  6. तिने दहावीपर्यंतचे शिक्षण निर्मल निकेतन स्कूल, गीदाम, दंतेवाडा येथे केले. तिने केपीएस भिलाई शाळेतही शिक्षण घेतले.

UPSC Success Story of IAS Namrata Jain

IAS का?

  1. दहा वर्षांची मुलगी असताना नम्रताने तिच्या गावी दंतेवाडा येथे हिंसाचार पाहिला. त्यावेळी पोलिस छावणीवर झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात अकरा पोलिसांचा मृत्यू झाला होता. (UPSC Success Story)
  2. पोलीस ठाण्याला आग लागलेली पाहून तिने स्वतःशी ठरवले की ती तिच्या संघर्षग्रस्त शहरासाठी काहीतरी करेल.
  3. आयएएस आणि आयपीएससाठी तिने छत्तीसगडला पहिली पसंती दिली आहे.
  4. नम्रता तिच्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना देते.
  5. तिने दंतेवाडा जिल्हा प्रशासनाद्वारे चालवल्या जाणार्‍या लक्ष्य कोचिंग सेंटरमधून UPSC व्यक्तिमत्व चाचणीचे प्रशिक्षण देखील घेतले. या केंद्रातून, तिला जिल्ह्यातील नागरी सेवकांकडून प्रशिक्षण मिळाले आहे.

UPSC Success Story of IAS Namrata Jain

नम्रताला UPSC परीक्षेत मिळालेले मार्क्स –

– Written Exam – 891/1750

– Interview – 171/275

– Final Total – 1062/2025 [52.44%]

नम्रता जैनचा समाजशास्त्र हा ऐच्छिक विषय होता. UPSC ची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी नम्रता चालू घडामोडींवर भर देण्यास  सांगते. तसेच ती टेस्ट सिरिज सोडवण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com