UPSC Success Story : डॉक्टर आई-वडिलांची टॉपर मुलगी; पॅनीक हल्ल्यांला दिली टक्कर; पहिल्या झटक्यात UPSC पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । फॅबी रशीद (IAS Fabi Rasheed) ही केरळची रहिवासी आहे. केरळला (UPSC Success Story) देवांचा देश समजला जातो. फॅबी यांचा जन्म 23 जून 1999 रोजी झाला. आज 25 वर्षांची फॅबी लाखो तरुणांसाठी आदर्श बनली आहे. त्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर देशातील एका सर्वोच्च संस्थेत प्रवेश घेतला. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करताच UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली आणि स्वप्नांना पंख दिले. हे त्यांच्या नशिबाचे आणि परिश्रमाचे फळ होते की ज्यामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास केली. सर्वांसाठी फॅबी रशीदची संपूर्ण कथा वाचा…

डॉक्टर आई-वडिलांची टॉपर मुलगी
फॅबी रशीदचा जन्म केरळमधील अलाप्पुझा येथे झाला आहे. त्यांचे आई-वडील डॉक्टर आहेत. फॅबीची आई बालरोगतज्ञ आहे. ती नुकतीच सरकारी नोकरीतून निवृत्त झाली आहे. फॅबीचे वडील आयुर्वेद तज्ज्ञ असून तेही सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. फॅबीने ICSE बोर्ड, त्रिवेंद्रमशी संलग्न सर्वोदय स्कूलमधून (UPSC Success Story) बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना 10वी मध्ये 96.7% आणि 12वी मध्ये 97.6% गुण मिळाले होते. ती 12वीत राज्यातील तिसरी टॉपर होती. यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्चमधून बायोलॉजिकल सायन्सच्या एकात्मिक अभ्यासक्रमात बी. एस. एम. एस. केले.

शासनाने दिली ‘INSPIRE फेलोशिप’
2017 ते 2022 पर्यंत IISER मध्ये शिकत असताना Fabi Rashid यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून INSPIRE फेलोशिप मिळाली आहे. फॅबी यांनी 2022 मध्ये (UPSC Success Story) ग्रॅज्युएशन पूर्ण करताच UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी संपूर्ण वर्ष मेहनत घेतली. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी, फॅबी रशीद यांनी तिरुवनंतपुरममधील एका संस्थेतून प्रशिक्षण घेतले. यामुळे त्याला यूपीएससी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती इत्यादी मूलभूत गोष्टी समजून घेण्यास मदत झाली.

‘मी स्वतःला भाग्यवान समजते..’
फॅबी रशीदच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. त्या 2023 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाल्या. फॅबी रशीदने UPSC CSE 2023 मध्ये 71 वा क्रमांक मिळवला होता. त्यांनी एका मुलाखतीत त्यांनी केलेल्या अभ्यासाच्या तयारीविषयी अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या; ” मी स्वतःला भाग्यवान समजते की मला आर्थिक किंवा इतर कोणत्याही संघर्षातून जावे लागले नाही ज्याचा सामना बहुतेक लोकांना करावा लागतो. यूपीएससी परीक्षेची तयारी करताना मला किंवा माझ्या पालकांना आरोग्याच्या कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही.”

झोपेशीही केली तडजोड (UPSC Success Story)
UPSC परीक्षा देत असताना फॅबी यांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. UPSC परीक्षेची तयारी करत असताना, फॅबी रशीद यांना अस्वस्थता आणि चिंतेच्या काळातून जावे लागले. या परीक्षेत तणाव येणं सामान्य आहे, परंतु त्यांच्यावर हा अतिरिक्त दबाव होता, जो त्यांनी स्वतःच निर्माण केला होता. त्यांना पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास करायची होती. अभ्यासाच्या तणावामुळे त्यांना पॅनिक अटॅक येऊ लागला. यावेळी त्यांनी झोपेशीही तडजोड केली होती. अभ्यास करताना त्यांनी लॅपटॉपचा भरपूर वापर केला; त्यामुळे त्यांचे डोळ्यांचे आरोग्य बिघडले.

लहानपणीच ठरवलं होतं सिव्हिल सर्व्हंट व्हायचं
फॅबी रशीद यांच्या कुटुंबातील एका सदस्याची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. याद्वारे त्यांना वयाच्या १४ व्या वर्षी नागरी सेवांची माहिती मिळाली. त्यानंतर शाळा-कॉलेजमध्ये काही नेतृत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामुळे काम पूर्ण करण्याची त्यांची समज विकसित झाली आणि काही गोष्टी सुधारण्याची संधीही त्यांना मिळाली. परिणामी नागरी सेवांकडे त्यांचे आकर्षण वाढले. या कोवळ्या वयात त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला सिव्हिल सर्व्हंट व्हायचं आहे.

मुलाखतीत विचारले ‘हे’ प्रश्न
फाबी रशीदने यूपीएससी परीक्षेत समाजशास्त्र हा पर्यायी (UPSC Success Story) विषय म्हणून निवडला होता. UPSC मुलाखतीची तयारी करत असताना, Rouse IAS स्टडी सर्कलचे CEO अभिषेक गुप्ता यांनी त्यांना मार्गदर्शन केले. UPSC मुलाखतीत त्यांना 3 मुख्य प्रश्न विचारले गेले – 1. भारतात ग्रामीण-शहरी आरोग्य समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? 2. IISER तिरुवनंतपुरम येथे केलेल्या संशोधनाची गुणवत्ता कशी सुनिश्चित करते? 3. भारतात अजूनही लोकसंख्या वाढ ही समस्या आहे का? जर होय तर मग यावर उपाय काय?
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com