UPSC Success Story : जिंकलस!! 4 वेळा अपयश आल्यानंतर 5 व्या प्रयत्नात केलं टॉप.. मिळवला IAS दर्जा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । असंख्य मुले-मुली भारतीय प्रशासकीय (UPSC Success Story) सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. आकडा असं सांगतो, की प्रत्येक वर्षी अंदाजे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेस बसतात. यापैकी काही जण 12 वीत असताना तर काहीजण पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; तर काही जण आपल्या मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नातच यश मिळवतात.

IIT आणि UPSC मध्ये मिळवलं यश (UPSC Success Story)
नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत फेरी पार केल्यानंतर १० लाखांमधून सुमारे १००० उमेदवार पात्र ठरतात. यापैकी एक आहे राजस्थानच्या जयपूर येथील आशीष सिंघल. या तरुणाने देशातील दोन कठीण परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. पहिल्यांदा त्याने आयआयटी जेईई (IIT JEE) परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्याने यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. परंतु, या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आशीषला अनेक अडचणींचा सामना करवा लागला. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आशीषला बरीच वर्षे मेहनत घ्यावी लागली. जाणून घेवूया आशीषच्या प्रेरणादायी प्रवासाविषयी…

नापास झाला म्हणून टोमणे ऐकावे लागायचे
आशीष लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होता. आशीष कुमार सिंघलचा यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. शिवाय तो आयआयटी टॉपरदेखील राहिला आहे. त्याने औद्योगिक व्यवस्थापन विषयात एम.टेक. पदवी घेतली आहे. त्यानंतर त्याने गुरुग्राममधील एका कंपनीत एक वर्ष काम केले; परंतु त्यानंतर चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. मात्र, नागरी सेवा परीक्षेत त्याला अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले आहे. तो नापास झाल्यामुळे अनेकांनी त्याला टोमणेदेखील ऐकवले; पण आशीष कधीही खचला नाही. तो हार न मानता, सातत्याने प्रयत्न करीतच राहिला.

चार वेळा आलं अपयश
UPSC परीक्षेत आशीषला चार वेळा अपयशाचा सामना करावा लागला आहे. २०१९ मध्ये पहिल्या प्रयत्नात तो मुख्य परीक्षा पास करु शकला नाही. २०२० मध्ये तो दुसऱ्यांदा पूर्व परीक्षेत नापास झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्याला पुन्हा मुख्य परीक्षा पास करण्यात अपयश आले. या परीक्षेत वारंवार अपयश येत असल्यामुळे (UPSC Success Story) नातेवाईक आणि मित्रमंडळी त्याला टोमणे मारत असत. पण दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने २०२२ मध्ये चौथ्यांदा UPSC साठी प्रयत्न केला; पण दुर्दैवाने यामध्येही त्याला अपयश आले. या चौथ्या प्रयत्नातील अपयशामुळे तो खूप निराश झाला होता.

चौथ्या प्रयत्नात पटकावली 8 वी रॅंक
चार वेळा यूपीएससी परीक्षेत अपयश आल्यानंतर आशीषने पुन्हा खूप मेहनत घेतली आणि तो पुन्हा तो परीक्षेला बसला. त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व चुका दुरुस्त केल्या. यावेळी त्याने एनसीईआरटी अभ्यासक्रमाच्या संदर्भासह झालेल्या अभ्यासाच्या उजळणीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले. अखेर 2023 मध्ये आशीष यूपीएससी परीक्षेत पास झाला आणि तो फक्त पासच झाला नाही, तर त्याने या परीक्षेत संपूर्ण भारतातून 8 क्रमांक पटकावला आणि तो UPSC मध्ये टॉपर ठरला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com