करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता यूपीएससी पूर्व परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने विहित अटी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. तेलंगण सरकारने ही योजना सुरू केली आहे. यूपीएससी प्रिलिम परीक्षेत पास होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल; अशी घोषणा तिथल्या सरकारने केली आहे.
‘राजीव गांधी नागरी अभयहस्तम’ योजना
तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी नुकतीच राज्यात ‘राजीव गांधी नागरी अभयहस्तम’ नावाची योजना सुरू केली आहे. ज्या तरुणांनी यूपीएससी प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे (UPSC) आणि ते यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना प्रोत्साहन देणे हा, या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत अशा उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रिलिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत निर्माण कार्यक्रमाचा भाग असेल.
कोण आहेत लाभार्थी (UPSC)
तेलंगण सरकारच्या राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजनेचा लाभ राज्यातील मूळ रहिवाशांनाच मिळू शकेल. यासाठी उमेदवार हा राज्यातला स्थानिक रहिवासी असणं बंधनकारक आहे. तेलंगणमधल्या सर्व प्रवर्गातल्या उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पात्र होण्यासाठी अटी
1. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी उमेदवाराने यूपीएससी पूर्व परीक्षा पास केलेली असावी.
2. उमेदवाराचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावं.
3. केंद्र किंवा राज्य सरकारमधल्या कोणत्याही (UPSC) स्थायी पदावर काम करणाऱ्या उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
4. कोणत्याही उमेदवाराला नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होताना एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
यूपीएससीकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा (CSE) ही देशातच नव्हे तर जगभरातल्या कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी उमेदवारांना कठोर मेहनत घ्यावी लागते. देशभरातून दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात पण मोजकेच लोक या परीक्षेत पास होतात. पूर्व परीक्षेत यश मिळाल्यानंतर उमेदवार मुख्य परीक्षेची तयारी करतात; त्यांना अर्थसाह्य देण्यासाठी तेलंगण सरकारने ही नवीन योजना सुरू केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com