UPSC Story : ‘त्या’ UPSC टॉपरची कहाणी; जो फक्त 6 दिवस कलेक्टर राहू शकला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा 2012 मध्ये दुसरा (UPSC Story) टॉपर आणि IAS अधिकारी श्रीराम वेंकटरामन यांची 24 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु अवघ्या सहा दिवसांनंतर 1 ऑगस्ट रोजी त्यांना या पदावरून हटवण्यात आले.

कलेक्टर होण्याचे स्वप्न घेऊन दरवर्षी लाखो तरुण UPSC च्या परीक्षेस बसतात. भारताच्या नागरी सेवेमध्ये दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते वर्षानुवर्षे परीक्षेची तयारी करत असतात. एवढी जीव तोडून मेहनत करून UPSC मध्ये अव्वल रँक मिळवून IAS अधिकारी झाल्यानंतर (UPSC Story) त्या अधिकाऱ्याला काही दिवसात जिल्हाधिकारी पदावरून काढून टाकले तर? मग तुम्ही विचाराल की असं होण्यामागचं कारण काय?

UPSC Story of IAS Shriram Venkataraman

सहा दिवसातच पदावरून हटवलं (UPSC Story)

UPSC नागरी सेवा परीक्षा 2012 मध्ये दुसरी रॅंक पटकावून टॉपर ठरलेल्या IAS श्रीराम वेंकटरामन यांच्यासोबत हे घडले, ज्यांना 24 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते परंतु केवळ सहा दिवसांनंतर 1 ऑगस्ट रोजी त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले.

नेमकं काय घडलं

खरं तर, 2019 मध्ये IAS श्रीराम वेंकटरामन यांच्यावर दारूच्या नशेत गाडी चालवताना पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या दरम्यान पत्रकार के. एम. बशीर (UPSC Story) यांचा मृत्यू झाला. बशीर ( वय 35) हे सिराज डेलीमध्ये ब्युरो चीफ होते.  केरळ सरकारने त्यांना अलप्पुझा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बनवल्यावर जनतेने त्यांना तीव्र विरोध केला; यामुळे  सरकारला वेंकटरामन यांना जिल्हाधिकारी पदावरून हटवून त्यांची दुसऱ्या ठिकाणी बदली करावी लागली.

डॉक्टरी पेशातून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये…

व्यंकटरमण हे डॉक्टरच्या पेशातून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आले. एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली आणि अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक मिळवला. तथापि, आयएएस अधिकारी म्हणून वेंकटरामन यांचा प्रवास वादात सापडला (UPSC Story) होता. मूळचे केरळमधील कोची येथील, श्रीराम वेंकटरामन यांनी भावश विद्या मंदिर – गिरीनगर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2010 मध्ये तिरुअनंतपुरमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले.

UPSC Story of IAS Shriram Venkataraman

अशी राहिली वादग्रस्त कारकीर्द 

ऑक्टोबरमध्ये केरळमधील तिरुअनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने आयएएस अधिकारी श्रीराम यांच्यावरील खुनाचे आरोप फेटाळून लावले होते.

2020 मध्ये केरळ सरकारने श्रीराम वेंकटरामन यांचे निलंबन रद्द केले. यानंतर श्रीराम यांना आरोग्य विभागाचे सहसचिव करण्यात आले. या निर्णयाविरोधातही जनतेने मोठ्या प्रमाणात विरोध केला होता.

पत्रकार संघटना, अनेक मुस्लिम संघटना (UPSC Story) आणि इतर अनेक संघटनांनीही त्यांच्याविरोधात आंदोलने सुरूच ठेवली.

सध्या ते केरळ राज्य नागरी पुरवठा निगम लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक आहेत.

UPSC Story of IAS Shriram Venkataraman

IAS रेणू राजसोबत केले लग्न

एप्रिल 2022 मध्ये, श्रीराम रमन यांनी UPSC नागरी (UPSC Story) सेवा परीक्षा 2014 मधील दुसरी टॉपर कलेक्टर रेणु राजशी विवाह केला. श्रीरामाचा हा पहिलाच विवाह होता पण रेणु राज यांचा हा दुसरा विवाह होता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com