करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये देशात प्रथम तीन क्रमांक मुलींचे असून यंदा मुलींनी बाजी मारल्याचं दिसत आहे. पहिला क्रमांक इशिता किशोर (Ishita Kishore), दुसऱ्या क्रमांक गरिमा लोहिया (Garima Lohia) आणि तिसऱ्या क्रमांक उमा हरिथीने पटकवला आहे.
संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
५ जून २०२२ रोजी लोकसेवा आयोगाकडून पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल २२ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पात्र उमेदवारांची १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा झाली. मुख्य परीक्षेचा निकाल ६ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला होता. १८ मे २०२३ रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.
त्यानंतर २३ मे रोजी निकाल जाहीर झाला आहे. २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतही देशात श्रुती शर्मा हीने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यामध्येही पहिले तीन क्रमांक मुलींचं पटकावले होते. अंकिता अग्रवाल दुसऱ्या तर गमीणी सिंगला तिसरा क्रमांक मिळवला होता.
दरम्यान, महाराष्ट्रातही प्रथम क्रमांक मुलींनीच मिळवला आहे. एकूण प्रसिद्ध झालेल्या ९९३ नावांमध्ये पहिला टॉप टेनमध्ये सहा मुली आहेत. तर, राज्यातून ठाण्यातील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (७६ वा क्रमांक), प्रतिक जराड (१२२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६) तर ऋषिकेश शिंदे (१८३) उत्तीर्ण झाले आहेत.