UPSC Recruitment 2024 : UPSC ची परीक्षा नाही.. आता थेट मुलाखतच द्या.. मंत्रालयात नोकरी करण्याची ही मोठी संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment 2024) मंत्रालयातील रिक्त पदांच्या भरतीसाठी निवड प्रक्रियेस सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ज्या पदावर काम करण्यासाठी IAS अधिकाऱ्यांना अनेक वर्ष वाट पहावी लागते त्या पदांसाठी उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवार खाजगी क्षेत्रातील हवा आहे. खाजगी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना मंत्रालयातील विविध पदांवर विराजमान करण्यात येणार आहे. ही भरती तीन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट वरती होणार असून त्याला आणखीन दोन वर्षांपर्यंतही वाढ देण्यात येऊ शकते. या संधीचा फायदा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा; असा निर्देश UPSC आयोगाने दिला आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्यासाठी upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०२४ आहे.

भरतीचे स्वरूप असे आहे (UPSC Recruitment 2024)
या भरती प्रक्रियेत मंत्रालयातील विविध विभागात रुजू असणाऱ्या जॉईंट सेक्रेटरी, डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. खरे पाहता या पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) स्पर्धा परीक्षा पास करावी लागते. सिव्हिल अधिकारी होऊन सेवेत मोठा अनुभव घेतल्यानंतर मंत्रालयातील जॉईंट सेक्रेटरी तसेच डायरेक्टरच्या भूमिका निभावण्याची संधी मिळते. पण युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) च्या या भरती प्रक्रियेतून खाजगी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मंडळींना थेट मंत्रालयात जॉईंट सेक्रेटरीचे पद भूषवण्याची संधी मिळणार आहे.

परीक्षा नाही.. थेट मुलाखत..
ही भरती प्रक्रिया नवीन नसून या अगोदरही जॉईंट सेक्रेटरीच्या पदांसाठी थेट भरती करण्यात आली होती. २०२१ साली देखील या पदांसाठी थेट भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या भरती (UPSC Recruitment 2024) प्रक्रियेदरम्यान खाजगी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती करण्यात आली होती. थेट भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही. उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते. यावेळी उमेदवाराकडे सर्व आवश्यक दस्तावेज असणे आवश्यक आहे अन्यथा निवड होणे कठीण होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com