12 वी पास विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी ! UPSC NDA 2021 प्रवेश प्रक्रिया सुरु

करिअरनामा ऑनलाईन ।केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एनडीए प्रवेश परीक्षेचे अर्ज जाहीर झाले आहेत. उमेदवार जर 12 वी पास असेल तर त्यांला सैन्यदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना फिजिक्स ,केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिकस या विषयासह किमान पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी 19 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 6 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी upsconline.nic.in या वेबसाईटवरच अर्ज करायचा आहे.

UPSC NDA & NA Recruitment 2021

प्रवेश परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता – 

1) मान्यताप्राप्त 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2 ) फिजिक्स ,केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिकस या विषयासह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक

3 ) अविवाहित पुरुषच अर्ज करू शकतात.

शारिरीक पात्रता –  उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या तंदरुस्त असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 2 जुलै 2002 पूर्वी आणि 1 जुलै 2005 यादरम्यान जन्म झालेला असावा.

शुल्क – 100 रुपये , SC / ST – शुल्क नाही. (अर्ज शुल्क कोणत्याही बँकेच्या क्रेडिट / डेबिट कार्ड / नेट बँकिंग सुविधेद्वारे किंवा एसबीआय बँकेत चालनाद्वारे करू शकता. )

नोकरीचे ठिकाण – Across India. UPSC NDA & NA Recruitment 2021

परीक्षा पद्धत –

परीक्षा लेखी पद्धतीने होणार आहे.

परीक्षेसाठी फक्त काळ्या बॉल पेन वापरने आवश्यक आहे.

प्रश्नपत्रिका इंग्रजी तसेच हिंदी भाषेतही उपलब्ध असणार आहे.

चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (अर्ज हा इंग्रजी भाषेमधेच भरणे आवश्यक आहे )

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 6 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com