UPSC : UPSC कडून घेतल्या जाणाऱ्या IES/ISS परीक्षा 2024चे हॉल तिकिट जारी; असं करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग ने भारतीय (UPSC) आर्थिक सेवा परीक्षा 2024 आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2024 ला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे (UPSC IES/ISS Hall tickets 2024) जारी केली आहेत. दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आयोगाने शुक्रवार दि. 14 जून रोजी upsconline.nic.in या अधिकृत ॲप्लिकेशन पोर्टलवर जारी केले आहे.

असं डाउनलोड करा प्रवेशपत्र (UPSC)
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज पोर्टलला भेट द्यायची आहे. त्यानंतर नवीन पृष्ठावर, उमेदवार त्यांचे संबंधित परीक्षा प्रवेशपत्र (UPSC IES/ISS Hall tickets 2024) डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करू शकतात. या पृष्ठावर, उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख यांचा तपशील भरून सबमिट करून प्रवेशपत्र (UPSC IES/ISS Hall tickets 2024) डाउनलोड करू शकतील.

UPSC ने IES/ISS परीक्षेची 2024 तारीख आधीच जाहीर केली होती. आयोगाच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दोन्ही परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड (UPSC) केल्यानंतर, उमेदवारांनी त्यावर दिलेला तपशील तपासावा आणि जर काही त्रुटी असतील तर दुरुस्त करण्यासाठी UPSC द्वारे जारी केलेल्या अधिकृत ई-मेल आयडीवर ई-मेल करा आणि वेळेत दुरुस्त करा, अशा सूचनाही आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com