करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा (CMS) 2020 परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवारानी 18 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. या परीक्षेचे आयोजन 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यूपीएससी सीएमएस परीक्षा संगणक आधारित आहे. उमदेवारांना कॉम्प्युटर बेस्ड मोडवर 2 ऑब्जेक्टिव पेपर्सची चाचणी द्यावी लागेल. संगणकाधारित मोडवरील या परीक्षेसाठी डेमो मॉड्युल, ई-अॅडमिट कार्ड जारी होण्यावेळी यूपीएससीच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल. अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/
पदाचे नाव – कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा (CMS) 2020
पदसंख्या – 559
पात्रता –
एमबीबीएसची अंतिम परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक भाग पात्र असणे आवश्यक – कम्बाइन वैद्यकीय सेवा परीक्षा, 2020 साठी आवश्यक शारीरिक आणि वैद्यकीय मानकांनुसार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.
वयाची अट – 32 वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क – खुला वर्ग – 200 रुपये, (महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पीडब्ल्यूडी – शुल्क नाही )
अर्ज करण्याची सुरुवात – 29 जुलै 2020
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 18 ऑगस्ट 2020
अर्ज मागे घेण्याची मुदत – 25 ते 31 ऑगस्ट
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
केंद्रीय लोकसेवा आयोगाने कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा (CMS) 2020 या परीक्षेच्या आधारे खालील पदावर भरती केली जाणार आहे.
1) रेल्वे मधील सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी
2 ) भारतीय शस्त्र कारखान्यांच्या आरोग्य सेवांमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
3 ) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट
4 ) नवी दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि दक्षिण दिल्ली मधील जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड -2
परीक्षा पॅटर्न –
यूपीएससी सीएमएस परीक्षेचे आयोजन दोन टप्प्यात घेण्यात येते. पहिला भाग संगणक-आधारित परीक्षा आहे ज्यामध्ये दोन विषय असतात. प्रत्येक विषयात 250-250 गुण असतात. प्रत्येक पेपर 2-2 तासांचा असतो. पहिल्या भागातील पात्र उमेदवारांना भाग 2 साठी बोलावले जाते. भाग 2 एक मुलाखत फेरी किंवा व्यक्तिमत्व चाचणी आहे. भाग 2 म्हणजेच मुलाखतीला 100 गुण असतात.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com