करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत (UPSC CDS Exam 2024) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 21 एप्रिल 2024 रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहे. ही परीक्षा पास करणाऱ्या उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि एअर फोर्स अकादमीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेचा कालावधी 6 तासांचा असेल. तर इंडियन मिलिटरी ट्रेनिंग अकादमीसाठी लेखी परीक्षेचा कालावधी 4 तासांचा असेल.
UPSC CDS परीक्षेची तारीख
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) CDS 2024 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. 21 एप्रिल 2024 रोजी ही परीक्षा होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही UPSC ची अधिकृत वेबसाईट https://upsc.gov.in/ ला भेट देऊ शकता.
परीक्षेसंदर्भात महत्वाचे – (UPSC CDS Exam 2024)
परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्राचे दरवाजे नियोजित वेळेच्या 10 मिनिटे आधी बंद होतील. इंग्रजीचा पेपर सकाळी 9 ते 11 या वेळेत होईल. GKचा पेपर दुपारी 12 ते 2 या वेळेत होणार आहे. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत प्राथमिक गणिताचा पेपर होईल.
अशी आहे निवड प्रक्रिया
UPSC CDS साठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाईल. परीक्षा प्रक्रियेचा तपशील खाली दिला आहे.
1. भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा 600 गुणांच्या परीक्षेत प्रत्येकी 200 गुणांचे तीन वेगवेगळे पेपर असतात. 2. एसएसबी परीक्षेसाठी निवड यादी लेखी परीक्षेत (UPSC CDS Exam 2024) मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
3. सर्व विषयांचा पेपर १०० गुणांचा असून तो पूर्ण करण्यासाठी २ तासांचा अवधी देण्यात आला आहे.
UPSC CDS निवड प्रक्रिया
1. SSB प्रक्रियेमध्ये फेज I आणि फेज II अशा 2 टप्प्यांची निवड प्रक्रिया समाविष्ट आहे. ज्या उमेदवारांनी पहिला टप्पा पार केला आहे त्यांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी (UPSC CDS Exam 2024) उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
2. स्टेज I मध्ये ऑफिसर इंटेलिजेंस रेटिंग (OIR) टेस्ट, पिक्चर पर्सेप्शन वर्णन टेस्ट (PP&DT) यांचा समावेश होतो. OIR चाचणी आणि PP&DT मधील कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
3. स्टेज II मध्ये मुलाखत, गट चाचणी अधिकारी कार्य, मानसशास्त्रीय चाचणी आणि परिषद समाविष्ट आहे. या चाचण्या ४ दिवसांत घेतल्या जातात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com