विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा देखील रद्द होणार? मंत्री उदय सामंतांचे UGG ला पत्र

नवी मुंबई । कोरोनाची महाराष्ट्रतील सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा देखील रद्द कराव्यात याबाबत राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे युजीसीला पत्र लिहिले आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

कोरोना संसर्गामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद असून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातही राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच याआधी दहावीचा बोर्डाचा शेवटचा राहिलेला पेपर रद्द केल्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी केली होती. तसेच सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकलून सर्व इयत्तांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र विद्यापीठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचीबाबत निर्णय झाला न्हवता. आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे युजीसीला पत्र लिहून याबाबत मागणी केली आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com