Unique Job Offer : इथे तुम्हाला झोपण्याचा मिळेल पगार!! ऐकून विश्वास बसणार नाही पण ‘या’ कंपनीत झोपण्यासाठी दिली जाते नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। ऑफिसमध्ये काम करायचं म्हटलं की ताण – तणाव आलाच. याबरोबरच सहकाऱ्यांच्या (Unique Job Offer) अंतर्गत राजकारणामुळे अनेकजण पुरते दमून जातात जातात. दररोजच्या त्याच त्या रटाळ रुटीनमुळे आयुष्यात काहीतरी बदल हवा; असं नेहमी वाटत राहतं. खूप कमी जणांना त्यांच्या ऑफिसमध्ये आवडीप्रमाणे काम मिळतं. पण अमेरिकेतील एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे काम दिलं आहे ते ऐकून आश्चर्याचा सुखद धक्का बसू शकतो. कार्यालयात दाखल होताच कर्मचाऱ्यांना गादी दिली जाते. त्यावर पूर्ण झोप घ्यायची आणि घरी निघून जायचं, असं या नोकरीचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे यासाठी चांगला पगारही दिला जातो.

सर्वात अनोखी नोकरी देणाऱ्या कंपनीच कॅस्पर असं नाव आहे. ही कंपनी गाद्या तयार करण्याचं काम करते. गाद्यांचा दर्जा कसा आहे हे तपासण्याची कंपनीला गरज असल्याने ही नोकरी उपलब्ध केली गेली आहे. भरपूर झोप घेणाऱ्या व्यक्तीचाच या पदासाठी कंपनीकडून नियुक्तीसाठी विचार केला जातो.

तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी

कंपनीच्या मते, 18 वर्षांवरील तरुण नोकरीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी 11 ऑगस्ट 2022 ही शेवटची तारीख असणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या तरुणांनी ‘स्लीप स्किल’चा छोटा व्हिडिओ तयार करून अर्जासोबत पाठवावा. नव्या गादीवर झोपताना अनुभव कसा येतो, हे तरुणांनी या व्हिडिओत सांगणं अपेक्षित आहे.

असं असेल कामाचं स्वरूप (Unique Job Offer)

नोकरी देताना कंपनीने काही मजेशीर नियम व अटी ठेवल्या आहेत.
ज्या उमेदवारांची कर्मचारी म्हणून निवड होईल ते ड्युटीच्या वेळी पायजमा घालून झोपू शकतात.
झोपण्यासाठी त्यांना दररोज नवीन गादी उपलब्ध केली जाणार आहे.
त्यांना कामाच्या वेळेत सवलतही दिली जाणार आहे.

नेटिझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

कॅस्पर कंपनीने #CasperSleepers या नावाने ट्विटरवर नोकरीसंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात एक लिंक दिली असून, नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या ट्विटवर नेटिझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘नोकरीसाठी मी अर्ज केला असून, माझ्यासारखी दुसरी झोपाळू व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही’, असं एका तरुणीनं म्हटलं (Unique Job Offer) आहे. तर, आधीच चांगली झोप घेणाऱ्या व्यक्तीला पैसे देण्याऐवजी निद्रानाश असलेल्या व्यक्तीस झोपण्यासाठी प्रवृत्त करून दाखवा, असं आव्हान दुसऱ्या एका युजरने कंपनीला दिलं आहे. आणखी एका युजरने तर चक्क मांजरीचा फोटो टाकून या पदासाठी मांजरीचा विचार होऊ शकतो का? अशी विचारणा केली आहे. रिकी नावाच्या युजरने प्रतिक्रिया देण्याऐवजी चक्क लिफ्ट, पार्क, स्वीमिंग पूल, हॉटेल, सोफा, मॉल अशा विविध ठिकाणी झोपलेला स्वत:चा व्हिडिओच शेअर केला आहे.

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com