Unique Career : स्टार्टअपला वय नसतं!! शिल्पा शेट्टीच्या 10 वर्षाच्या मुलाने सुरु केला स्टार्टअप

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा अवघा 10 वर्षांचा आहे. मात्र (Unique Career) वियानने नुकताच स्वतःचा स्टार्टअप सुरु केल्याची माहिती शिल्पा शेट्टीने दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत तीने ही माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टीने सोशलमीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहित आपल्या मुलाच्या स्टार्टअपच्या कल्पनेबद्दलही माहिती दिली आहे. वियानने कस्टमाइज्ड स्नीकर्स बनवले असल्याची तीने सांगितले आहे.

Unique career viaan kundra

 

कस्टमाइज्ड शूज, कपडे, व बॅग बनवणार

वियान राज कुंद्राने त्याच्या ब्रँडचे नाव VRKICKS व Viaan Kick असे ठेवले आहे. त्याच्या या स्टार्टअपमध्ये कस्टमाइज्ड शूज, कपडे, व बॅग बनवण्यात येणार आहे. या उत्पादनाची किंमत 4999 पासून सुरु होणार आहे. या स्टार्टअपमधून होणारे उत्पादन शिल्पा शेट्टी फौंडेशनला जाणार आहे.

शिल्पा शेट्टी सांगते की; “माझा मुलगा विआनचा हा पहिला आणि अनोखा व्यावसायिक उपक्रम @vrkickss आहे. लहान मुलांना आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.

Unique career viaan kundra

उत्पन्नातून करणार दानधर्म (Unique Career)

कल्पनेपासून ते उपक्रमापर्यंत, डिझाइन आणि अगदी व्हिडिओपर्यंत सर्व काही विआनने केले आहे. उद्योजक आणि डायरेक्टर अशा दोन्ही भूमिका तो या वयात पार पडतो हे आश्चर्यकारक आहे,. इतक्या लहान वयात त्याने यामधील काही उत्पन्न दान करीन असे वचन दिले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com