Unique Career Options : कधी ऐकलंय का? प्राण्यांशी बोलून ‘ती’ कमावते लाखो रुपये!! कोण आहे ‘ही’ महिला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज प्रत्येकजण करिअरच्या मागे धावतोय. आपलं करिअर (Unique Career Options) एकदम सेट असावं असं कोणाला वाटत नाही? जगात असे अनेक करिअरचे पर्याय आहेत ज्या मधून लोक भरघोस पैसे कमावतात. आजची हि बातमी एका आगळ्या वेगळ्या करिअर फिल्ड विषयी आहे. तुम्ही ऐकाल तर चक्रावून जाल. अमेरिकेतील एका महिलेनं प्राण्यांच्या भावना ओळखण्याचं करिअर निवडलंय. यामधून ती लाखो रुपये कमावते. आज तिची अँपॉईनमेंट मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. जाणून घेऊया या आगळ्या वेगळ्या करिअरविषयी…

58 लाखाची नोकरी सोडली

निक्की वास्कोनेझ ही अमेरिकन महिला आहे. तिचं करिअर अगदी सेट होतं. ती प्रॉपर्टी लॉयर म्हणून नोकरी करत होती. या कामातून तिला वर्षाकाठी 58 लाख रुपये मिळायचे. पण तिने लाखोंचे पॅकेज (Unique Career Options) धुडकावले आणि प्राण्यांशी बोलण्याचे अनोखे करिअर सुरु केले. या प्रोफेशनमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिची अँपॉईनमेंट मिळण्यासाठी आता अनेक लोकांना वाट पाहावी लागत आहे कारण तिच्याकडे दररोज अनेक लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना घेऊन रंग लावतात.

‘Animal Whisperer’ एक कला (Unique Career Options)

जे लोक पाळीव प्राणी पाळतात त्यांना त्यांचे रिलेशन त्यांच्या पाळीव प्राण्यासोबत छान असावेत असं वाटतं. यासाठी ते सर्व काही करतात, पण कधीकधी अडचण अशी असते की त्यांना त्यांच्या प्रिय प्राण्याचे मन समजत नाही; अशा परिस्थितीत निक्की लोकांना मदत करते. ज्यांच्याकडे प्राण्यांचे मन समजून घेण्याची अनोखी कला आहे त्यांना व्यावसायिक प्राणी व्हिस्पर्स (Animal Whispers) म्हणतात. हीच कला निकीने अवगत केली आहे.

अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे राहणाऱ्या निक्की वास्कोनेज नावाच्या महिलेकडेही अशीच एक कला आहे, ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळत आहे. एकेकाळी वकील असलेल्या निक्कीला आता लोक एक प्रोफेशनल थेरपिस्ट मानतात. ती प्राण्यांच्या आवाजावरूनच त्यांच्या मनातलं समजून घेते. तिने पशुवैद्यकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि आज त्यात ती पारंगत झालेली आहे.

2020 मध्ये सुरु केले करिअर

33 वर्षीय निक्की वास्कोनेझ ही पूर्णवेळ प्रॉपर्टी लॉयर होती आणि तिला तिच्या व्यवसायातून सुमारे 58 लाख रुपये वर्षाचे पॅकेजही मिळत होते. त्याचबरोबर निक्कीने स्वतःला प्राण्यांच्या (Unique Career Options) मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षित केले आणि नंतर तिला याचा इतका आनंद मिळू लागला की तिने तिची नोकरी सोडली आणि एक थेरपी क्लिनिक उघडले. तिने सप्टेंबर 2020 मध्ये प्राण्यांच्या थेरेपीला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा प्रचारही केला आणि त्यानंतर तिच्याकडे अनेक लोक रांगा लावू लागले.

निक्की करिअरमध्ये एकदम खुश

निक्की तिच्या नवीन नोकरीमुळे खूप खुश आहे. पूर्वी तिला खूप तास काम करावे लागायचे आणि ती या कामाबाबत आनंदी नसायची. पण आता चित्र बदलले आहे. निक्कीने तिचे करिअर बदलल्यापासून तिचं आयुष्य सुखी आहे. तिला तिच्या कामातून इतकी प्रसिद्धी मिळाली आहे; की पाळीव प्राणी घेऊन येणारे अनेकजण सध्या वेटिंगवर आहेत. या कामातून निक्की कमाईही चांगली करते. ती तिच्या एका सेशनसाठी २७ हजार रुपये घेते. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तिने आधी घरातील पाळीव प्राणी आणि अनोळखी पाळीव प्राण्यांचे मन वाचून आपले काम सुरू केले आणि मग ती व्यावसायिक पातळीवर आली. तिला पाळीव प्राण्यांशी बोलण्यासाठी 4000 लोकांकडून Request आल्या आहेत.

तुम्हाला देखील हे करिअर आवडलं तर तुम्ही सुद्धा प्राण्यांची मने वाचून चांगले पैसे कमवू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com