Unique Career Options : असं बनवू शकता ‘Marine Archaeology’ मध्ये करिअर; कुठे घ्याल शिक्षण? किती मिळतो पगार? जाणून घ्या…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । Marine Archaeology म्हटलं की (Marine Archaeology) डोळ्यासमोर उभी राहते ती महासागरात बुडालेली Titanic. जहाज बुडाल्यानंतर सुमारे 50 वर्षानंतर त्याच्या अस्तित्वाचा शोध लागला होता. जमिनीवर घडलेल्या इतिहासचे पुरावे शोधण्यात पुरातत्व विभाग नेहमीच काम करत असतो. जे हाती लागेल ते मिळवत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न या विभागातील अधिकारी करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का खोल सामुद्राचा इतिहास देखील उघडला जाऊ शकतो, त्याची मुळं किती खोलवर रुतलेली आहेत यचा अंदाज लावला जाऊ शकतो. तर कोण आणि कसं  करतो हे काम जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा….

Marine Archaeology

काय आहे Marine Archaeology?
‘Marine Archaeology’ ही पुरातत्व विभागाची एक शाखा आहे. जमिनीवर ज्या प्रमाणे Archaeologist सतत इतिहासीतील पुरावे शोधात असतात त्या प्रमाणे Marine Archaeologist समुद्र, नद्या, तलाव आणि इतर पाण्याच्या ठिकाणाहून पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत (Marine Archaeology) असतात. इथे सापडणाऱ्या अवशेषांवरून ते मानवी जीवनाचा इतिहास समजून घेतात. यांना ‘Underwater Archaeologist’ म्हणूनही ओळखलं जातं. पाण्याखाली मिळणारे अवशेष जसे की इमारती इ. चा वापर करून ते आपला अभ्यास करत असतात.

Marine Archaeology

कसे बनाल Marine Archaeologist?
Marine Archaeologist बनण्यासाठी तुम्ही आधी विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे आहे. या नंतर किमान 50% गुणांसह Post Graduation पूर्ण करावं लागेल. या व्यतिरिक्त विषयाची आवड व ज्ञान असल्यामुळे या क्षेत्रात प्रगती करण सोपं जातं. शेवटी Research करून तुम्ही अंतिम phdची पदवी मिळवू शकता. इथे यशस्वीपणे काम करण्यासाठी तुम्हाला विविध भाषांचे ज्ञान असावं लागतं. यासोबतच तुम्हाला GIS, GPS, Computer Modeling, Mathematical Modeling याबद्दल माहिती असावी लागते.

Marine Archaeology

इथे मिळेलMarine Archaeologist ची पदवी (Marine Archaeology)
1. Department of Coastal Disaster Management, Pondicherry University.
2. Veer Narmada South Gujarat University, Surat, Gujarat.
3.Annamalai University, Anna Nagar, Tamil Nadu
4. Cochin University of Science and Technology, Cochin, Kerala.

 

 

Marine Archaeology

किती मिळतो पगार?
Marine Archaeologist म्हणून काम करत असताना सुरुवातीला 3 ते 4 लाखांपर्यंत पगार दिला जातो, या नंतर वाढत्या अनुभवानुसार तो 5 ते 8 लाख होतो. त्यामुळे तुम्हाला जर का काही अनोखं करिअर निवडायचं आहे तर नक्कीच तुम्ही Marine Archaeologist बनावं. यानंतर तुम्ही भारताच्या नावाजलेल्या कार्यालयांमध्ये अधिकारी म्हणून रुजू होऊ शकता ज्यामध्ये पुढील कार्यालयांचा समावेश आहे.
1.Department of Ministry of External Affairs
2. Defence Services
3. Council of Cultural Relations
4. Archaeological Field Units and Trusts
5. Archaeological societies or Organizations
यांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com