Unique Career Option : रोबोटिक्स इंजिनिअर्स…करिअरचा एक नवा मार्ग; तुम्ही पात्र आहात का?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पूर्वी जिथे माणूस तासन्  तास मेहनत करून (Unique Career Option) काम करू शकत होता, आता ते सर्व काम मशिनच्या मदतीने कमी वेळात केले जाते. याचे कारण जगातील नवीन तांत्रिक गोष्टींचा विकास आहे. ज्यामध्ये रोबोट्सचा प्रामुख्याने सहभाग असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्ही रोबोटिक्स इंजीनिअर्सबद्दल अधिक जाणून घेऊ शकाल. चला तर मग या क्षेत्राविषयी सविस्तरपणे माहिती घेवूया…

जे सामान्य माणूस करू शकतो अशा अनेक गोष्टी रोबोट करू शकतो. या क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या विकासाचे कारण म्हणजे रोबोटिक्स इंजिनीअरिंग. हा अभ्यासक्रम आजच्या विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता अभ्यासक्रम ठरत आहे. हा कोर्स केल्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये नोकरीचे उत्तम पर्याय मिळू शकतात. मात्र हा कोर्स करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यासंबंधीची सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे.

काय असतं रोबोटिक्स इंजिनिअरींग (Unique Career Option)

एक प्रकारचे स्वयंचलित यांत्रिक उपकरण संगणक प्रोग्रामिंगच्या मदतीने कार्य करण्यास सक्षम केले जाते. ज्याला कोणीही त्याच्या इच्छेनुसार नियंत्रित करू शकतो. ज्यामध्ये सेन्सर्सपासून ते मॅनिप्युलेटर्सपर्यंत, वीजपुरवठा आणि नियंत्रण यंत्रणा सर्व काही एकत्र काम करतात. अनेक (Unique Career Option) शाखांचा समावेश असलेल्या रोबोटिक्स अभियांत्रिकीमध्ये यांत्रिक, इलेक्ट्रॉनिक, संगणक विज्ञान अभियांत्रिकी यांचा समावेश होतो. जे रोबोट डिझाइन, बांधकाम, वीज पुरवठा आणि सॉफ्टवेअर यांसारख्या गोष्टींवर काम करते.

ही पात्रता असणं आवश्यक

  • जर तुम्ही बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असेल तर तुम्ही रोबोटिक्स इंजिनीअरिंगमध्ये करिअर करू शकता.
  • जर तुम्ही बॅचलर केले असेल, तर पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्ही रोबोटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी घेऊ शकता, तुम्हाला या क्षेत्रात चांगले करिअर करायचे असेल तर मेकॅनिक, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • रोबोटिक्स अभियांत्रिकी हा दीर्घकालीन संशोधनाभिमुख अभ्यासक्रम आहे. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस निवडूनही करिअर करू शकता. (Unique Career Option)
  • रोबोटिक्स इंजिनीअरिंगमध्ये तरुणांना चांगले करिअर आणि चांगला पगार दोन्ही मिळतो. तुम्ही लाखो ते करोडो रुपये पगार मिळवू शकता.
  • याशिवाय सेफ्टी रोबोटिक्समध्ये तुम्ही लष्करी किंवा बॉम्ब निष्क्रिय करणारे रोबोटिक्स क्षेत्रात करिअर करू शकता.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com